Top Post Ad

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका ग्लोबल टेंडर काढून लस विकत घेणार


ठाणे शहरातंर्गत लसीकरण मोहिम अधिक व्यापक आणि गतीमान करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता ५ लक्ष लस विकत घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून लसीचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे महापालिकांवरही ताण येत आहे. यावर मार्ग म्हणून महापालिकांनी स्वतःच्या स्तरावर लसखरेदी करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांना दिले आहेत. शिंदे यांच्या सूचनेनंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. .या सदर्भात तात्काळ ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाल्या दिल्या आहेत. सदर निर्णयामुळे ठाणे शहरातील लसीकरण मोहिम गतीमान होण्यास मदत होणार आहे.

 सध्या लशीची पुरवठ्यात काही अडथळे येत असल्यामुळे एमएमआर प्रदेशातील महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी करून नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करण्यावर राज्य शासनाने सर्वतोपरी लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने अलिकडेच ५० लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा प्रक्रिया राबवली आहे. याच धर्तीवर एमएमआरमधील सर्व महापालिकांनी आपल्या शहरांमधील नागरिकांसाठी आवश्यक लसीचे प्रमाण आणि सरकारकडून होणारा पुरवठा याचा अंदाज घेऊन येणारी तूट भरून काढण्यासाठी लस खरेदी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश  शिंदे यांनी दिले आहेत.

 राज्य सरकार लसीकरण सुरळीत व्हावे आणि लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी हरेक प्रयत्न करत आहे. लसींचा तुटवडा लक्षात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्यात आले असून ४५ व त्यापुढील वयोगटातील ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशांना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक असल्याने महापालिकांनी आपल्या स्तरावर लसखरेदी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com