Trending

6/recent/ticker-posts

एसटी चालक व कंडक्टर यांना कोविड भत्ता मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

   कोरोनाच्या पहिल्या लाटेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या फ्रंटवर असणाऱ्या / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी आपलं जीव पणाला लावून सेवा दिली होती व आजही दुसऱ्या लाटेत ही ते आपली सेवा निर्भिडपणे बजावत आहेत.कोरोना संसर्ग वाढत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अजून ही पूर्ण पणे चालत आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोरोना काळात कार्यरत बस वाहक व चालक ह्यांना गेल्या वर्षी मार्च ,एप्रिल ,मे २०२० या तीन महिन्यात प्रत्येकाला 300 रु कोविड भत्ता  देण्यात आला होता. 

दुसऱ्या लाटेत ही एसटी बस चालक व वाहकांनाअ अजूनहीकोविड भत्ता अदा करण्यात आलेला नाही. मात्र कोरोना काळात सेवा देत असलेल्या कर्मचारी ह्यांचे एक दिवसाचे पगार कपात करण्यात आले आहे. एसटी महामंडळ कडून सदर कर्मचाऱ्यांना कोरोना काळात घेताना कोणतीही सुरक्षेच्या सोय सुविधा ही उपलब्ध करून दिली जात नाही. कोरोना काळात काळजी घेण्यासाठी सुरक्षाकिट ही उपलब्ध केलेले नाहीत . कोरोनाच्या वाढता प्रभाव पाहता सदरील कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून कोरोना काळातील सुरक्षाकिट त्यांना उपलब्ध करून दयावे.तसेच लवकरात लवकर  थकीत कोविडभत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे

    एसटी वाहक, चालकांसह शासकीय- निमशासकीय सेवेतील कायमस्वरूपी व कंत्राटी सेवकांना देखील सुरक्षा साधने व कोविड भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे, अशी विनंती जगदीश खैरालिया, सरचिटणीस यांनी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या