Trending

6/recent/ticker-posts

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यभर आंदोलने

मुंबई / ठाणे

मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांची विशेष सरळसेवा भरती सुरू करावी, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नती आरक्षण धोरण लागू करावे, पदोन्नती आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या जागी मागासवर्गीय अभ्यासू मंत्री नियुक्त करावा तसेच 7 मे च्या शासन निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणा-या भीम आर्मी आजाद समाज पार्टीच्या आंदोलकांवरील अजामीनपात्र दाखल गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे अशा मागण्यांसाठी आज मुंबईच्या दादर पूर्व   रेल्वे स्टेशन समोर भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आली

  भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व मुंबई कार्याध्यक्ष इंजिनियर अविनाश गरूड यांच्या नेतृत्वाखाली अविनाश समींदर,सुशीलाताई कापूरे, जाहीद शेख ,श्रावण राठोड,संदीप गायकवाड, सुरेश धाडी, मनीषाताई उबाळे,क्रांतीताई खाडे, तृप्तीताई वाघमारे,जयश्रीताई कांबळे,पंचशीलाताई खराटे,मनीषाताई  बनसोडे,  सादीक सिद्दिकी , आम्रपाली देशमुख,अब्दुल आवेसी,आदील अंसारी  नौशाद सिद्दिकी, शमीम खान,सादीक खान,  लईक शेख,नफीस अहमद,  फहीम सय्यद, नफीस अहमद, मोहसिन खान ,इम्रान शेख यांच्यासह भीम आर्मी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

  पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याचा निषेध करीत आरक्षण हक्क कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने करण्यात आली.  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर व जिल्ह्यात आज ठिकठिकाणी राज्य शासनाच्या या मनमानी निर्णया विरोधात आंदोलन करण्यात आली आहे. येथील शासकीय विश्रामगृहासमोर आरक्षण हक्क कृती समितीचे नेते हरिभाऊ राठोड, यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी  आंदोलन करुन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, यांना निवेदन देऊन राज्य शासनाचा हा पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. 

 राज्य शासनाच्या या निर्णया विरोधातयेथील बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेते डाँ. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन राज्यभर तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा दिला. तर लहुजी संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी सचिव दीपक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर  तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडले. या आंदोलनात सरकारला ईशारा लहुजी संघर्ष सेनेचे संघटक समाधान अंभोरे,  सूर्यकांत साबळे, राजेश जाधव, रवि सोनोने शंकर लोखंडे, ज्ञानेश्वर गायकवाड आदींचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या