Top Post Ad

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप


डोंबिवली : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक, ऑक्सिजन पुरवठा, औषधे आणि हॉस्पिटलमधील बेड यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रसिद्धी माध्यमे सांगत आहेत. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना देखील घडत असते. त्याच अनुषंगाने कोरोना बाधितांना उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. 

 सदर योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली, व इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यावेळी माजी महापौर विनिताबाई राणे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थर्वल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शहर प्रमुख राजेश मोरे, राजेंद्र चौधरी, नगरसेवक दीपेश म्हात्रे नगरसेवक विश्वनाथ राणे विधानसभा संघटक तात्या माने, राजेश कदम, सागर जेधे, संजय पावशे, एकनाथ पाटील, राहुल म्हात्रे उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com