Top Post Ad

ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समितीची ऑनलाईन बैठक संपन्न

 नासिक :-ग्राहक(उपभोक्ता) संरक्षण  समितीची राज्य व जिल्हा पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणेकामी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय महासचिव राजेश आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाध्यक्ष प्रकाश घोळवे यांच्या अध्यक्षतेखाली ३० मे रोजी संपन्न झाली. यावेळी राज्य सचिव मा. सत्यजित जानराव सर यांनी समितीच्या प्रमुख राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी यांचा परिचय करून बैठकीतील चर्चेल्या जाणाऱ्या विषया   बाबत माहिती दिली. सध्या कोरोना काळात ग्राहक, रुग्ण यांची विविध स्तरावरून होणाऱ्या आर्थिक लूटी बाबत ग्राहक (उपभोक्ता)संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. 

   समितीचे राज्य प्रवक्ता रवींद्र पारधे  यांनी प्रास्ताविक केले. नवीन राज्य /जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी परिचय व समिती प्रति आपली बांधिलकी याबाबत मनोगत व्यक्त करून समितीच्या वाढीसाठी समर्थन जाहीर केले. राष्ट्रीय महासचिव मा. आंधळे सर यांनी समितीच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून समितीच्या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष रूपांतरित करण्याचे आवाहन केले.  राजाध्यक्ष प्रकाश घोळवे यांनी ग्राहक, रुग्ण यांची होणारी आर्थिक, मानसिक  पिळवणूक थांबविणे कामी पदाधिकारी यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगून याकामी राष्ट्रीय अध्यक्ष, राजाध्यक्ष, हे पदाधिकारी यांचे पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे आश्वासन सर्व पदाधिकारी यांना दिले.                                       

राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी ग्राहक(उपभोक्ता) संरक्षण समितीचे ध्येय व उद्देश याबाबत नूतन पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून समितीच्या 24 मार्गदर्शक तत्वाचे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगून पदाधिकारी यांची भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेणार असल्याचे सूचित करून कामाला लागून समिती संवर्धनाचे आवाहन केले. 

       राज्य सचिव सत्यजित जानराव सर यांनी सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करून पदाधिकारी यांनी समितीच्या मार्गदर्शक तत्व व नियमावली, महत्वाचे म्हणजे शिस्त व वेळेचे बंधन पाळून समितीचे कार्य व  गौरव  राज्यस्तरावर पोहोचविन्याचे आवाहन केले व उपस्थितांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या  राज्य कार्याध्यक्ष निवृत्ती रोकडे यांनी उपस्थित पदाधिकारी यांनी दोन तास चाललेल्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सदर बैठकीसाठी 14जिल्ह्यातील राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com