रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्याना मिळाली हक्काची घरे

ठाणे :

ठाण्यातील संकल्प चौक ते संतोषी माता चौक रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या हाजुरी येथील 30 कुटुंबियांना  हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम देखील रखडले होते तो अडसर देखील त्यांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याने दुर झाला आहे.  संकल्प चौक,रघुनाथनगर ते संतोषी माता चौक,हाजुरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम गेले २ वर्षांपासून बंद होते आता हे काम सुरू झाले आहे. यामध्ये बाधित झालेल्या ४८ जणांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून घरे देण्यात आली होती  परंतु हाजुरी येथील अजून ३० जणांचे पुनर्वसन बाकी होते   ठाणे महापालिका आयुक्तानी सदरच्या प्रस्तावावर सही केली असून उर्वरित ३० कुटुंबियांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कुटूंबियांनी सर्वांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या