येऊर स्वच्छतेसाठी - एक रविवार

माणसाच्या अतिक्रमणाचे दुष्परिणाम शहराबरोबरचआता जंगलातही दिसून येत आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलातील अस्वच्छता. ही बाब लक्षात घेऊन ठाण्यातील `युवा संस्कृती' आणि `एकलव्य क्रीडा मंडळा' या स्वयंसेवी संस्थांतर्फे येऊरमधील वन स्वच्छता अभियान हाती घेण्यात येते. या संस्थांच्या वतीने दर रविवारी येऊरच्या जंगलाची स्वच्छता करण्यात येते. स्वच्छतेतून प्राण्यांना त्यांची मूळ जीवनशैली प्राप्त करून देणे तसेच वनसंपदेचे संवर्धन करणे हा या अभियानाचा व्यापक उद्देश आहे.  

येऊर हे ठाणेकरांचे सर्वात आर्कषणाचे ठिकाण. याठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. सध्या करोनाच्या काळात पर्यटकांची संख्या कमी असली तरी, परिसरात राजरोसपणे होणाऱया पार्ट्यांमुळे मद्याच्या बाटल्यांसमवेत प्लास्टिक पिशव्या, पाणी-शेतपेयाच्या बाटल्या, थर्माकोलच्या डिशेस-पेले सर्वत्र परिसरात पसरल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरते. हा सगळा कचरा संस्थेचे तरुण कार्यकर्ते गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावतात.  

जागतिक दर्जाची जैवविविधता लाभलेल्या येऊर येथे दररोज अनेक पर्यटक फिरायला येतात. परंतु पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही व्यवस्था येथे दिसत नाही. तसेच केलेला कचरा टाकण्यासाठी कचरापेट्यांची संख्या पर्यटकांच्या तुलनेत कमी आहे.  यासाठी वाढत्या पर्यटकांच्या सोयीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. जर कोणाला एक रविवार या स्वच्छता अभियानाला द्यायची इच्छा आहेल, त्यांनी संदीप पवार (90297 33198) यांच्याशी संपर्क साधावा.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA