गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप देखील काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील गिरीश कुबेर यांचा निषेध केला असून “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रासह देशभरात कायमची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत समाज बांधवांचे असलेलं मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सदर पुस्तकाबाबत भाष्य केलं आहे. असे लिखाण आपण खपवून कसे घेतो? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा आक्रमक इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे. यामुळे या पुस्तकाला सर्वच स्तरातून विरोध केला जात असून महाराष्ट्र सरकार कठोर पाऊल उचलणार का ? हे महत्वाचं ठरणार आहे.
-------------------
प्रति,
मा. उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
विषय : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या रीनैसंस द स्टेट या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाण व पुस्तकांवर तात्काळ बंदी घालणेबाबत. .
महोदय,
वरील नमूद केलेल्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही आपले या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधू इच्छीतो. गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये केले असून यावर बंदी घातली पाहिजे.स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते.संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं.चारित्र्यसंपन्न,स्वराज्य निष्ठीत व स्वराज्यरक्षक असणाऱ्या राजावर रयतेचे सुध्दा प्रचंड प्रेम होत.अशा महान छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पध्दतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पध्दतीने छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही कथा,कांदबऱ्या मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे.परंतु छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही.या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो.कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे.आम्हा सगळ्या इतिहास संशोधक - अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.आमची आपल्याला विनंती राहील की, "रीनैसंस द स्टेट" या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत.
जो पर्यंत लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत. कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात.ते अभ्यासू आहे असेही बोलले जाते.ते छत्रपती संभाजी महाराजांविषयी अज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही चौकशी झाली पाहीजे. आपण या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करु याची आपण नोंद घ्यावी.तसेच सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही करीत आहो. धन्यवाद !!
कळावे,
आपले,
सुहास राणे.
प्रदेश उपाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र.
मो.नं.९९२०६५९४६४.
0 टिप्पण्या