नाशिकमधील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मदत करणाऱ्या जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल

   नाशिकमधील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अमोल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दाखल करते वेळी हॉस्पिटलने त्यांच्याकडून दिड लाख रुपये डिपॉझिट भरून घेतलं. डिस्चार्ज झाल्यानंतर अमोल जाधव यांच्या हातात सगळं मिळून तब्बल १.९० लाखांचं बिल देण्यात आलं, त्यांनी ते भरलं देखील. पण यानंतर जाधव यांनी डिपॉझिट म्हणून भरलेल्या दिड लाख रुपयांची मागणी केली, पण त्यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटल प्रशासनानं हे डिपॉझिट देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी जितेंद्र भावेंना मदतीची  मागणी केली. भावेंनी तात्काळ हॉस्पिटलच्या प्रशासनाशी चर्चा सुरु केली. हो-नाही म्हणतं गोष्ट आंदोलनावर आली. आंदोलन सुरु झाल्यानंतर काही वेळातच हॉस्पिटल प्रशासनानं हे दिड लाख रुपये परत करण्याची तयारी दाखवली, आणि ते जाधव यांना परत केले. यानंतर ही मोहीम फत्ते झाली. 

मात्र त्यानंतर  काही वेळातच तिथं मुंबई नाका पोलिस दाखल झाले आणि त्यांनी भावे यांना चौकशीसाठी ताब्यात  घेतलं. तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर भावे यांना सोडण्यात आले. यात त्यांच्यावर विनापरवना आंदोलन करणे.  तसेच असभ्य वर्तन करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान जितेंद्र भावे  यांच्या समर्थनार्थ आलेल्या २५ जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमाव गोळा करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र भावे महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाचे नेते  आणि प्रवक्ते आहेत. सोबतच नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये ते दिल्लीच्या धर्तीवर 'मिशन हॉस्पिटल' नावाची एक चळवळ चालवतात. यातून ते रुग्णांना ऑक्सिजन, रेमडिसीव्हिर, अशा गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयतन करतात. सोबतच ते रुग्णांचं हॉस्पिटलमधील बिलं कमी व्हावं म्हणून देखील प्रयत्न करतात. आपल्या या सामाजिक कार्यातून आजपर्यंत त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली आहे तसेच आतापर्यंत रुग्णांचे पाच कोटीहून अधिक रुपये वाचवले असल्याची चर्चा आहे.

जितेंद्र भावे यांच्या या अर्धनग्न होऊन गांधीगिरी करत केलेल्या आंदोलनाच्या फेसबुक लाईव्हचा एक व्हिडीओ राज्यात प्रचंड व्हायरल झाला आहे. या  व्हिडीओला १९ कोटी पेक्षा जास्त रिच आहे. त्यातील व्हिळ्ज आहेत तब्बल २२ लाख, तर शेअर्स आहेत जवळपास ३४ हजारांच्या जवळपास. लाईक्स सांगायचे झाले तर ते आहेत साधारण ९ लाख २५ हजारच्या घरात..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA