महासभेत नगरसेवकांच्या मुस्कटदाबीविरोधात राष्ट्रवादी-काँग्रेस, भाजप नगरसेवकांचा उद्रेक
ठाणे
ठाणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत नगरसेवकांचा आवाज म्युट केला जात असल्याची तक्रार अनेकवेळा नगरसेवकांकडून केली जात आहे. तसेच होणारी चर्चा आणि ठराव यांच्यात नियमितपणे तफावत आढळत असते महासभेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणार्या नगरसेवकांचे आवाज म्यूट करुन सोयीचे ठराव पारीत केले जात आहेत. ऑनलाईन महासभेच्या नावाखाली ठामपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी-काँग्रेस, भाजपच्या नगरसेवकांनी हे गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली. . या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे , भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि विक्रांत चव्हाण यांनी नगरसेवकांची बाजू आयुक्तांपुढे मांडली. यावेळेस तिन्ही पक्षांचे सर्व नगरसेवक उपस्थित होते
या भेटीत तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार केली असून, योग्य तोडगा काढावा, अशी विनंती केली. या सर्व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
ठाणे पालिकेचा कारभार हा एखाद्या प्रायव्हेट लिमीटेड कंपनीप्रमाणे चालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केला. “ठाणे पालिकेमध्ये सध्या खासगी कंपनीप्रमाणे कारभार केला जात आहे. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणार्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करणे, सोयीप्रमाणे ठराव पारीत करुन घेणे असे प्रकार सुरु असून हे प्रकार या पुढे खपवून घेणार नाही,’ असे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण म्हणाले.
तर, हणमंत जगदाळे यांनी, सन 2014 पासून ठामपामध्ये कायद्याने महासभा चालत नाही. ऑनलाइन सभेच्या आड भ्रष्टाचार केला जात आहे. सभागृह चालवण्याची पद्धत निदनिय झाली असून होणारी चर्चा आणि ठराव यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप यावेळी केला.
ऐका विशिष्ट पक्षाच्या आदेशाने महापलिका चालत आहे. काही अधिकार्यांनी देखील सत्ताधार्यांशी हात मिळवणी आहे... आम्ही सभागृहाच्या बाहेर बसलो की राज्य सरकार अडचणीत येईल, असा दावा विक्रांत चव्हाण यांनी केला.
0 टिप्पण्या