
राज्य सस्कारच्या सेवेत क्लासवन अधिकाऱ्यांपासुन ते चर्तुर्थश्रेणीतील कर्मचारी मिळून तब्बल २ हजारहून अधिकजन बोगस आदीवासी असलेल्यांना संरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय प्रसिष्द करत अश्शा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य या नव्या प्रकारात समाविष्ट करत त्यांची नोकरी जाणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी तल्कालींन फडणवीस सरकारने माजी सामाजिक न्यापमंत्री राजकुमार बडोले आणि स्व.विष्णू सवरा यांच्या नेतृत्वाखाली समितीही स्थापन केली. मात्र फडणवीस सरकार जावून राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलें. पा सरकारने या बोगस आदीवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्या वर्गात समाविष्ट करण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन 'भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरगिती स्थापन केली.
मात्र जवळपास २० हून अधिक पक्षकारांनी २१ डिसेंबर २०१९ च्या राज्य सरकारच्या आदेशालाच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका विहित कालावधीत तेथेच दाखल करता येते. त्यावर राज्य सरकार किंवा कोणाला त्या निर्णयाच्या बाहेर जावून निर्णय घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारचा तो शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय दिला.परिणामी आदीवासी असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेल्या आणि जात पडताळणी समितीकडून सदरचे प्रमाण पत्न खोटे असल्याचे सिच्द झाल्यानंतर सरकारची फसवणुक करणाऱ्यांना सरकारी सेवेतून काढून टाकावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विले होते.
0 टिप्पण्या