Top Post Ad

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 ठाणे 

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या असून आज जिल्हा परिषदेच्या आवारात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थित रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी रवाना करण्यात आल्या. यावेळी आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र,शहापूर तालुक्यातील अघई आणि टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुरबाड तालुक्यातील किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवले आणि शिरोशी आदी आरोग्य केंद्राना या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या आहेत.ठाणे जिल्ह्यातील या ग्रामिण कार्यक्षेत्रातील रुग्णांना ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांची मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या आणीबाणी प्रसंगी या रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावतील.असा विश्वास प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी व्यक्त केला.
   प्राथमिक आरोग्य केंद्रासह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण उप रुग्णालयामध्ये देखील रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामीण उप रुग्णालय भिवंडी, शहापूर, अंबरनाथ,  खर्डी, टोकावडे, गोवेली, आणि मनोरुग्णालय ठाणे आदी ठिकाणी देखील शासनाने रुग्णवाहिका पुरविल्या आहेत.
------------------


21 जून पर्यत क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलम आझाद ट्रॉफी ( विद्यापिठांसाठी), 2021 साठी नामांकने सादर करण्याबाबत कळविले आहे.  या पुरस्काराबाबतची नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज हे https://.yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिनांक 21 जून 2021  रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. विहित कालावधी नंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. 
केंद्र शासनास   surendra.yadav@nic.in  किंवा  girnish.kumar@nic.in या ईमेलवर सदर करावेत. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे  (दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल साळुंखे यांनी  केले  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com