Trending

6/recent/ticker-posts

आषाढी वारीबाबतचा निर्णय मुंबईत मंत्रीमंडळाच्या बैठकित

 


आळंदी- 

राज्यभरातील वारकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आषाढी वारीबाबत  पुणे विधानभवनामधे राज्यातील मानाच्या पालखी सोहळाप्रमुखांसोबत शुक्रवारी  बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागिय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह, सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव बन्सल, सोलापूर जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, यांच्यासह आळंदी देवस्थान, देहू देवस्थानसह संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत  चांगा वटेश्वर आदी संतांच्या विश्वस्त आणि पालखी सोहळाप्रमुखांची उपस्थीती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीवर गडद सावट आहे. आळंदी देवस्थानने पालखी मार्गावरिल  पालखी मुक्‍कामांच्या गावांशी पत्रव्यवहार करून वारीबाबत मते मागवली. यंदाच्या वर्षी आषाढी पायी वारीस तत्वत: परवानगी देण्यात यावी ही एकमुखी मागणी वारकऱ्यांच्या वतीने आहे. पायी वारीस किती लोकांनी जायचे, त्याबाबतचे शासकिय निकष आणि मार्गदर्शक तत्व याबाबत वारकरी आणि शासन एकत्रीत भूमिका ठरवावी. त्याचे पालन वारकऱ्यांकडून केले जाईल. असे आश्वासन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर अभय टिळक यांनी दिले. 

संत मुक्ताबाई संस्थानचे प्रमुख ऍड रविंद्र पाटील म्हणाले की, "यंदा आषाढी वारी सोहळ्यासाठी संत मुक्ताबाईची पालखी १४ जूनला सर्वांच्या आधी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या दृष्टीने शासनाने लवकर निर्णय कळवा." श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाळे, "मागिल वर्षी राज्यातील  प्रमुख संतांच्या पालख्या एसटीने परवानगी दिली. मात्र यंदाच्या वर्षी प्रस्थान पूर्वीच निर्णय दिला तर सर्व देवस्थानांना तयारी करता येईल."

देहू संस्थानचे सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले,"सातशे वर्षांचा सोहळा वारीची परंपरा जतन केली. मागील वर्षी कोरोनाबाबत जागृतता नव्हती. मात्र आता मोजक्या लोकांमधे परतानगी द्यावी. पायी वारीची एकमुखी मागणी केली. गावच्या बाहेर पटांगणात आम्ही सोय करू. कोरोनाबाबतची सर्व काळजी घेऊ

यावर उत्तर देतांना अजित पवार म्हणाले, आषाढी वारीबाबतचा निर्णय आता मुंबईत मंत्रीमंडळाच्या बैठकित सर्वानुमते घेतला जाईल. आषाढी पायी वारी पालखी  सोहळ्याबाबत एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही. दहा जूनपर्यंत राज्यातील सर्व प्रमुख पालखी सोहळा प्रमुखांना हा निर्णय कळविण्यात येईल, आषाढी वारीबाबत राज्यभरातील वारकऱ्यांच्या भावनेचा आदर करतो. राज्यावर कोरोनाचे महासंकट आहे. मागिल वर्षपिक्षा सध्या कोरोनाची स्थिती भयानक आहे. सध्या रूग्णांची संख्या कमी झाली  तरी तिसरा टप्प्यात कोरोनाबाबत अधिक सतर्कता बाळगली जाईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या