Top Post Ad

कल्याणमधील राजणोली उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण

   कल्याण- कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी पश्चिम उपनगरातील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या मेट्रो रेल्वेची चाचणी कांदिवली येथील आकुर्ली स्थानकावर करण्यात आली. पश्चिम द्रुतगती महामार्ग ( टर्मिनल १ व टर्मिनल २ ) येथील नियंत्रण प्रवेश भुयारी/उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन, मल्टीप्लीसिटीज या पुस्तकाचे विमोचन तसेच रांजणोली उड्डाणपुलाचे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त आर.ए.राजीव उपस्थित होते.

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत ई लोकार्पण झाल्यानंतर  शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह या दोन्ही पुलांचे लोकार्पण प्रत्यक्ष जागेवर येऊन केले. यावेळी पालकमंत्री  शिंदे यांच्यासह कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणचे खासदार कपिल पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी माजी आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.

कल्याण शहराला जोडणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर बांधण्यात आलेल्या चार मार्गिकांच्या पुलापैकी पहिल्या दोन मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. पत्रिपुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर दुर्गाडी पुलापाशी वाहतूक वाढल्याने वाहतूककोंडी होऊ लागली होती. या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच दोन्ही मार्गिका सुरू होत्या. अशात या नवीन पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्याने शहराला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. 

या नवीन पुलामुळे जुन्या पुलावरून येणे आणि नव्या पुलावरून जाणे शक्य होणार असल्याचं मत  शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर मुंबई-आग्रा महामार्गावरून  नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजणोली उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यामुळे भिवंडी जंक्शनपाशी होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. त्याचा फायदा या महामार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या छोट्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होणार आहे.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com