परतूर नगर परिषद कार्यालयाचा कामगारावर अन्याय

जालना
 परतूर नगर परिषद कार्यालयामध्ये व सांस्कृतिक सभागृहाला कायम कर्मचारी हा अधिकृत हजर व उपस्थित असतानाही त्याला हजेरीपटावरून वंचित ठेवण्यात आले आहे. जेणेकरून प्रशासकीय सोयी सुविधांपासून हा कर्मचारी वंचित रहावा असा शासनाचा हेतू दिसत आहे. नगर परिषदमधील चतुर्थ श्रेणी वर्ग सेवा जेष्ठता बढतीपात्र कायम कर्मचारी असल्याने वर्ष २०१८-२०१५ रोजीला सांस्कृतिक सभागृहाचे काम पाहणे व देखरेख करण्याला लेखी आदेशपत्र दिले गेले. परंतु मागील मार्च (२०२१) महिन्याच्या सुट्टी रजावरुन रुजू व हजर होण्यासाठी अगोदर लेखी अर्ज देऊन सुध्दा कार्यालयीन हजेरी पटावरील सही नोंद करण्याकरीता वंचित केले गेले असल्याची तक्रार  रमेश रतन कांबळे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद परतूर यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे. आपण  बहुजन वर्गातील कर्मचारी असल्यामुळे कायम कर्मचाऱ्याला सेवा जेष्ठता असतांना सुध्दा खाजगी कायद्याने सफाई काम करण्याचे सांगीतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

वर्ष २०१५९ ला नगर परिषदमध्ये चतुर्थ श्रेणी वर्गात कायम सेवेत रुजू व भरती झालेल्या नविन सफाई कर्मचाऱ्यांना कार्यालयीन व बाह्य विभागाला मुकादम पदावरील काम पाहणे व बढती देऊन इतर काही (२०२१) बाहेर गावाहून आलेल्या सफाई कर्मचाऱयांना बढती पदावर सेवा कर्तव्य करण्याचे नियमबाह्य अधिकार दिलेले आहेत त्यातील कोणालाही परत स्वच्छता विभागाकडे न पाठविता एकट्यालाचा जातीय भेदभाव करुन असमानतेने अपमान, अन्याय केला जात आहे. याबाबत वारंवार लेखी अर्ज तक्रार दाखल करुनही कायम कर्मचाऱ्याची योग्य अधिकृत हरकत घेण्याला कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आजपर्यंत टाळले जात आहे.

 नगर परिषद कार्यालयाला आणि सांस्कृतिक सभागृहाला कर्मचारी हा नियमानुसार हजर राहून कायदेशीर लेखी देऊन यापुर्वी व आतापर्यंत उपस्थित आहे म्हणून तोंडी हजर करुन घेतल्याने एप्रिल (२०२१) या महिन्याचा  पगार मिळाला आहे. तरी कर्मचाऱ्याच्या हजेरी सहीची नोंद घेतली जावून अधिकृत हजर करुन घेऊन दखल घ्यावी, अशी विनंती कांबळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA