Top Post Ad

मराठा आरक्षण कुठं अडकलं


 हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सेव्ह मेरिट फाऊंडेशन ट्रस्टची चॅरीटी कमिशनरकडे अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली. त्यांच्याकडून राज्यभर आरक्षणाच्या विरोधात मोर्चे काढले गेले. या मोर्चात सेव्ह मेरीटचे प्रमुख म्हणून अनुप मरार हे अग्रभागी होते. पुढे सुप्रीम कोर्टात सेव्ह मेरिट फाऊंडेशनच्या देवेंद्र जैन, रुचिता कुलकर्णी, मधुश्री जेथलिया या तिघांनी मराठा आरक्षणाविरोधात तीन याचिका दाखल केल्या. मराठा आरक्षणाविरोधात या याचिकाकर्त्यांकडून सेव्ह मेरिट फाऊंडेशनच्या वतीने अरविंद दातार यांच्यासारखे मोठे वकील देण्यात आले. दहा-बारा याचिकाकर्त्यांपैकी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी विरोध केला असेल तर तो या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वकीलांनी. 

गायकवाड अहवालातल्या त्रूटी, 102 वी घटनादुरुस्ती, इंद्रा साहनी-जर्नेलसिंगसारखे खटले, मराठा समाजातील लोकप्रतिनिधी नोकरदार यांची आकडेवारी इत्यादी मराठा आरक्षणाबद्दलच्या नकारात्मक बाबी याच वकिलांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडल्या. अर्थातच हा सर्व डाटा सेव्ह मेरीटवाल्यांना पुरवला गेला इतकेच नाही तर या कायदेशीर प्रक्रीयेत लागणारा पैसा सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ट्रस्टकडून दिला गेला. चॅरीटी कमिशनरकडे नोंदणीकृत असणाऱ्या या सेव्ह मेरिट ट्रस्टचे एकूण 7 सदस्य आहेत. पैकी फडणवीसांचे निकटवर्तीय व भाजपचे पदाधिकारी असणारे अनुप मरार हे त्यातील प्रमुख ट्रस्टी आहेत. कारण संबंधीत ट्रस्टच्या व्यवहार व संपर्कासाठी अनुप मरार यांचे नाव देण्यात आले आहे. 2020 मध्ये या ट्रस्टकडे लाखो रुपये फंड जमा झाला होता. ही सगळी माहिती चॅरीटी कमिशनरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या सेव्ह मेरिटचे इतरही सदस्य संघ-भाजपमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सक्रीय आहेत.  CAA-NRC कायद्याच्या समर्थनातील रॅली असो किंवा संघ-भाजपचे मेळावे कार्यक्रम, हे सेव्ह मेरिटचे बहुतेक सर्व ट्रस्टी त्यात सहभागी असतात. 

नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल ही एक यातील कॉमन गोष्ट आहे. या सात ट्रस्टींमधले तिघे चौघे या हॉस्पिटलशी निगडीत आहेत. यात अजून एक कॉमन गोष्ट अशी की फडणवीसांच्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या ज्या Embedded Creations ने वेबसाईट बनवल्या त्याच Embedded Creations ने सेव्ह मेरिट मेरिट सेव्ह नेशनची वेबसाईट बनवली आहे. तसेच या सेव्ह मेरिट फाऊंडेशनचे सर्व ट्रस्टी हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या चॅरीटी कमिशनरकडेच या ट्रस्टची नोंदणी झालेली आहे. सेव्ह मेरिट सेव्ह मेरिट नेशन फाऊंडेशनचे मुख्य ट्रस्टी. देवेंद्र फडणवीस आणि अनुप मरार हे दोघेही नागपुरातील सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी ही त्यांची आणखी एक ओळख. तसेच डॉ. अनुप मरार हे विदर्भाच्या भाजप डॉक्टर सेलचे विद्यमान समन्वयक.  भाजपचे पदाधिकारी आणि सेव्ह मेरिट फाऊंडेशनचे ट्रस्टी असणारे अनुप मरार हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. ज्यांनी मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय धुर्तपणाने सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या नावाखाली मराठा आरक्षणाच्या विरोधात ही नियोजनबद्ध योजना राबवली होती हेही यातून उघड होते.

आता प्रश्न असा उरतो की फडणवीसांनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका का घेतली? तर याचे उत्तर असे आहे की मराठ्यांनी काढलेले मोर्चे, राज्यभर झालेली आंदोलने, आंदोलकांच्या पन्नासपेक्षा जास्त आत्महत्या, त्यामुळे आषाढी एकादशीला रद्द करावा लागलेला पंढरपूरचा दौरा, जाईल तिथे होणारा विरोध या सगळ्या गोष्टी फडणवीसांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खुप जिव्हारी लागल्या. शिवाय आरक्षण विरोध हा संघाचा पहिल्यापासून प्रमुख अजेंडा आहे. धनगर आरक्षणाप्रमाणे सर्वेक्षण, अहवाल, समितीच्या नावाखाली मराठा आरक्षणही लांबवायचे ही  योजना होती. पण मराठा समाजाचा इतका दबाव होता की नाईलाज झाला. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण दिले होते यात कोणाचे काडीचेही योगदान नाही. कारण यासाठी दबाव आणणारे मराठा, उच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील मराठा, माहिती दस्त पुरवणारे मराठा, आयोगाचे अध्यक्ष मराठा आणि अगदीच स्पष्ट बोलायचे झाले तर न्यायाधीशही मराठा. यात रफिक दादांसारख्या इतर जाती धर्माच्या व्यक्तींनीही मोलाची साथ दिली. पण या सगळ्यात फडणवीसांचे योगदान काय तर 14 हजार मराठा आंदोलकांवर पोलीस केसेस करुन त्यांचे करीअर बरबाद केले आणि पन्नासपेक्षा जास्त मराठा आंदोलकांचा जीव घेतला.

2014 साली आघाडी सरकारने मराठा-मुस्लिम आरक्षण जाहीर केल्यावर फडणवीसांनी सत्तेत आल्यास आघाडी सरकारचे हे सर्व निर्णय रद्द करु असे स्टेटमेंट केले होते. नंतर हायकोर्टात आपले पंटर पाठवून या दोन्हीही समाजाचे आरक्षण रद्दही केले. आत्ताही तेच केले आहे. आपल्याच पक्षाचे पदाधिकारी व शाळेतले मित्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या गोंडस नावाखाली सुप्रीम कोर्टात पाठवले आणि सत्तेत असताना संकलित केलेल्या माहितीतील त्रूटी मराठा आरक्षणाविरोधात त्यांना पुरवल्या. केंद्र सरकारच्या वकीलांना सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेण्याच्या सूचना केल्या. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला. मराठा आरक्षण रद्द झाले. केवळ जातीय द्वेष व अहंकारातून आपल्या शेंडीने मराठा आरक्षणाचा गळा कापला आणि फडणवीसांची ही शेंडी होती भाजप पदाधिकारी असणाऱ्या त्यांच्याच शाळकरी मित्राने स्थापन केलेली सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही संघटना.

-- अपर्णा रामटेके  (नागपूर)

मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका कर्ते... १) रूचिता जतिन कुलकर्णी (बामण)  २) विष्णुजी मिश्रा ( बामण) ३)उदय गोविंदराज ढोपळे (बामण)  ४)अमित ललित गुगळे (बामण) ५)अदित्य बिमल शास्त्री (बामण)  ६) देशमुख ईशा गिरीश ( बामण) ७) कमलाकर दरवाडे ( बामण)  ८) संजीत शुक्ला( बामण)  ९) माधुरी नंदकिशोर जेठालिया (मारवाडी)  १०) देवेंद्र रूपचंद जैन ( जैन) ११) सागर दामोदर सारडा ( जैन)   (लोणच्याला चवीपुरते हे दोन-१२) मोहमंद सय्यद नुरी शफि अहमद (मुस्लिम) १३)जयश्री पाटील (st)

आता एक प्रश्न - मेजोरीटीने बामण आणि वैश्य समाज हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात गेला असताना वरिल ११ याचिका कर्त्यांना  (बामण व वैश्य मिळून) वगळून मिडिया सतत फक्त सदावर्तेला पुढं चर्चेला पुढे का आणत आहे.?  यातून बामणी मिडियाला काय साध्य करायचे आहे? मिडिया या सर्व याचिका कर्त्यांना समोर का आणत नाही?  सदावर्तेचा खांदा म्हणून तर वापर केला जात नाही ना? सदावर्ते च्या मागचे बोलविते धनी कोण आहेत हे कळू न देण्यामागचे कारण काय? 

----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com