डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून ठाण्यात 'ऑक्सिजन बॅंक'

एमएमआर विभागासाठी १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या 'ऑक्सिजन बॅंक'चा शुभारंभ
ठाणे – कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्सद्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तसेच  शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.  या प्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

एमएमआर रीजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.  


 दरम्यान ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील दोन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज, शनिवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  ठाण्याचे खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, सभागृह नेते अशोक वैती व अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. 

 ठाणे महानगरपालिकेतर्फे एमएमआर क्षेत्रात एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा पहिलाच ऑक्सिजन प्लांट आहे. हा प्लांट कार्यान्वित झाल्याने या कोविड सेटरमधील ३०० बेड्सना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटर पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. एअरॉक्स कंपनीने उभ्या केलेल्या या दोन्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांटद्वारे प्रतिदिन ३५० सिलेंडर म्हणजेच ३.२ टन एवढा ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमध्ये प्रत्येक दिवशी ८५० लीटर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. हे प्लांट अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत उभे करण्यात आले असून त्याद्वारे निर्माण झालेला ऑक्सिजन पाइपलाइन द्वारे या कोविड केअर सेंटरमध्ये वापरण्यात येणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA