परळचे केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये 5 कोटीचा घोटाळा

 मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय केईएममध्ये 5 कोटी रूपयांचा घोटाळा प्रकरणी पोलीसांनी अकाऊंटन्टला अटक केली आहे. या प्रकरणात दोन अकाऊंटन्टवर आरोप ठेवण्यात आला असून एकाला अटक केली आहे तर दुसरा फरार आहे. तब्बल दहा वर्ष या दोन आरोपीनी संस्थेतील अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षरीने रुग्णालय प्रशासनाच्या खात्यातून हे पैसे स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर व इतर खात्यांमध्ये वळवल्याचे तपासात समोर आले आहे. आरोप करण्यात आलेले राजन राऊळ, श्रीपाद देसाई  हे दोन अकाऊंटन्ट गेली दहा वर्षे झाली ही पैशाची अफरातफर करत असल्याचं समोर आलं आहे. यापैकी राजन राऊळ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर श्रीपाद देसाई फरार आहे

परळचे केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या अकाऊंटमधून हे पैसे काढण्यात येत होते. या आधी कार्यरत असलेल्या अधिष्ठातांच्या नावाचा गैरवापर करुन, त्यांच्या बनावट सह्या करुन हे अकाऊंटन्ट पैसे काढत होते. यामध्ये डॉक्टर अविनाश रेघे आणि डॉक्टर निर्मला सुपे यांच्याही नावाचा गैरवापर करून या आरोपींनी पैसे काढले होते. सध्याचे केईएमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. त्या अहवालाच्या आधारे या दोन अकाऊंटन्टवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. सेठ गोवरधन सुंदरदस मेडीकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या आकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA