रुग्णालयातील सामान गायब केल्यानंतर आता निविदेतून मलाई खाणारा मुरूडकर याला रंगेहात अटक


 ठाणे- जागतिक महामारीचा विळखा मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्राला पडला आहे. त्यातच सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. लॉकडाऊन फक्त सर्वसामान्य, मजूर, कामगारांनाच उपाशी मारत आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा पगार सुरु असल्याने त्यांना या लॉकडाऊनचा काही परिणाम जाणवत नाही. अशाही परिस्थितीत आणखीन माया जमवण्यासाठी ठाणे महापालिकेचे अधिकारी  मिळेल ती संधी साधत आहेत. ठाणे महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी राजू मुरुडकर याला  पाच लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात अटक केली आहे. 

ठाणे महानगर पालिकेला ३० व्हॅन्टीलेटर पुरवण्याची निविदा मंजूर करून देतो असे डॉ. राजू मुरुडकर याने नवी मुंबईतील  इमिनो शॉपचा मालक शिवम भल्ला यांना सांगितले. एकूण निविदा रकमेच्या दहा टक्के रक्‍कम म्हणजेच पंधरा लाख रुपये मुरुडकर याने भल्ला यांच्याकडून लाच मागितले. मुरुंडकर याने त्याच्या ऐरोली येथील लाइफ लाइन या खासगी रुग्णालयात आणून  देण्यास सांगितले. त्यानुसार अँटी करप्शन   ब्युरोच्या अधिकाऱयांनी सापळा रचला. मल्ला याने लाइफलाइन रुग्णालयात मुरुडकर याला पाच लाख रुपये देताच अँटी करप्शनच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ 'पकडले. कोविडच्या महामारीचा फायदा घेऊन लाचखोरीने स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरोधात ठाणेकर प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा आणि कौसा येथे म्हाडाच्या माध्यमातून कोरोना हॉस्पिटले उभारण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर ती तात्पुरती बंद करण्यात आली. आता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही, दोन्ही हॉस्पिटले बंदच आहेत. त्यातच या हॉस्पिटलमधील साहित्य गायब झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली १५ कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना रेतीबंदर येथेच कळवा पोलिसांनी रोखले. आम्हाला वरिष्ठांचा आदेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते,  कोविड सेंटरमधील घोटाळा उघड होऊ नये, यासाठी आम्हाला पाहणी करण्यापासून रोखण्यात आले,

 ठाणे महानगर पालिकेची घोटाळे आणि भ्रष्टाचाराची परंपरा अखंड सुरु आहे. अद्यापही ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांच्या विरोधात राष्ट्रीय पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षाने सर्व पुरावे देऊनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई सोडाच त्याला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर दादोजी कोंडदेव स्टेडीयममध्ये होत असलेल्या प्रचंड घोटाळ्याची चौकशी करावी यासाठी वर्तमानपत्रातून सातत्याने बातम्या येत असतानाही  क्रिडा अधिक्षक मिनल पालांडे यांना पदोन्नती देऊन महापालिकेने भ्रष्टाचाराला चालना दिली आहे. यामागे कोणत्या पक्षाचा वरदहस्त आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा एकंदरीत महिन्याचा हप्ता किती आणि कोणत्या नेत्याला जातो अशा प्रश्न आता ठाणेकरांना पडला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या