ऐतिहासिक विहीर

 


२४ एप्रिल १९३७ 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वळसंग च्या ग्रामस्थांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग...

एकसंघ भारताचे निर्माते, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंग गावाला २४ एप्रिल १९३७ रोजी भेट दिली होती. त्या काळात गावामध्ये स्पृश्य - अस्पृश्य भेद होता... गावाच्या सार्वजनिक विहिरीवरुन पाणी पिण्यास बंदी होती. बाबासाहेबांचे अस्पृश्य निवारणाच्या कार्याची प्रेरणा घेऊन वळसंग गावातील लोकांनी स्वतः दिवस रात्र एक करून मोठी विहीर खोदली पण जोवर स्वतः बाबासाहेब या विहिरीचे पाणी पिणार नाही तोपर्यंत विहिरीचे पाणी न पिण्याचा त्यांनी निश्चय केला.

बाबासाहेबांच्या हस्ते विहिरीचे थाटात लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी बाबासाहेबांचे औक्षण करणाऱ्यांना बाबांनी स्वतःच्या हातांनी रेशीम दोर आणि चांदीच्या ग्लासाने आडातील पाणी शेंदुन दिले...स्वतः बाबासाहेबांनी विहिरितले पाणी पिले... तेव्हा पासून २४ एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गावात सगळीकडे रांगोळ्या काढल्या जातात. मिठाई वाटप केली जाते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

बाबासाहेबांच्या भेटीचा ऐतिहासिक ठेवा वळसंग करांनी उत्सवाच्या रुपात जपून ठेवला आहे...

एकसंघ भारताचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी गावाला भेट दिल्यापासून आज ८४ वर्षे साजरा होतो हा उत्सव...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA