Top Post Ad

कोविडच्या प्रभावी नियंत्रणासाठी ठाणे महापालिकेने केली वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक


 ठाणे
कोरोना आपत्तीमध्ये ठाणेकरांचे हाल होत असून रूग्णांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची बाब तसेच महापालिकेची व्होल्टास, बुश, बोरिवडे येथील रूग्णालयं बंद असून कौसा रूग्णालयही बंद.  रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठीही रूग्णांच्या नातेवाईकांचे होत असलेले हाल. शहरातील रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यातही महापालिकेला आलेले अपयश या बाबींवर  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत लक्षवेधी सूचना मांडली. याची प्रशासनाने दखल घेत  शहरातील बाधित रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच कोरोनाच्या प्रभावी सामन्यासाठी प्रत्येक कक्षाकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरीही त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या कक्षाची स्थापना याअगोदरच करण्यात आली असून कोविडचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज नेमणूक करण्यात आली. तसेच प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कक्षाच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

या आदेशान्वये वॉर रुम कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता रामदास शिंदे – ९७६९००७७९९ तर उपकक्ष प्रमुख उपअभियंता सुनिल पाटील ९६१९९११०८९ यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष प्रमुख, उद्यान निरीक्षक केदार पाटील (मोबाईल क्रमांक ९९३००९४७६८ ) उपकक्ष प्रमुख कनिष्ठ अभियंता अभिषेक सुर्वे (मोबाईल क्रमांक ९७७३८२७८२८), ऑक्सीजन व्यवस्था कक्ष प्रमुख उपआयुक्त संदीप माळवी (मोबाईल क्रमांक ९७६९०७१३१४ ) उपकक्ष प्रमुख सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे (मोबाईल क्रमांक ९९६९२०१६६० ), औषध आणि इतर साहित्य पुरवठा कक्ष प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर (मोबाईल क्रमांक ९ २२१३ २४३४६ ) उपकक्ष प्रमुख -वैद्यकीय अधिकारी योगिता धायगुडे (मोबाईल क्रमांक ९८२१६१६००२ ), लसीकरण केंद्रांची स्थापना आणि संचलन करणे कक्ष प्रमुख – लेखापाल अधिकारी प्रदिप मकेश्वर (मोबाईल क्रमांक ९६१९४७६७६१) उपकक्ष प्रमुख अदिती कदम (मोबाईल क्रमांक ८०९७५३२४१७ यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

चाचणी केंद्रांच्या संचलनासाठी कक्ष प्रमुख नगर अभियंता रविंद्र खडताळे (मोबाईल ९८१९३७९२२२ ) उपकक्ष प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.खुशबू टावरी , (मोबाईल क्रमांक ९४२२१ ४१९७१), कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार यामध्ये समन्वय साधणे कक्ष प्रमुख उपआयुक्त अशोक बुरपल्ले ( मोबाईल क्रमांक ९७७३१९५५५४ ) उपकक्ष प्रमुख- डॉ. अनिता कापडणे (मोबाईल ९९६९०५१२४४ ), हॉस्पिटल प्रशासन आणि रुग्णसेवेचे व्यवस्थापन- सनियंत्रण, ग्लोबल हॉस्पिटल कक्ष प्रमुख उपआयुक्त विश्वनाथ केळकर (मोबाईल क्रमांक ८२९११ ८५०६६) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ . अनिरुध्द माळगांवकर (मोबाईल ९७६९००७५७० ), पाकिंग प्लाझा हॉस्पिटल प्रशासन व रुग्णसेवेचे व्यवस्थापन व सनियंत्रण कक्ष प्रमुख उपआयुक्त विश्वनाथ केळकर (मोबाईल ८२९११८५०६६ ) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ. विवेक चिंचोलकर (मोबाईल ९८२०४०४४१२ ) यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

कौसा डीसीएच कक्ष प्रमुख – उपआयुक्त मनिष जोशी (मोबाईल ९१६७०४३६०६) उपकक्ष प्रमुख कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी (मोबाईल ८६९८६६१६६६), कौसा डीसीएच कक्ष प्रमुख उपआयुक्त मनिष जोशी , (मोबाईल ९१६७०४३६०६ ) उपकक्ष प्रमुख अधिव्याख्याता डॉ. मोहित शेटे (मोबाईल क्रमांक ८०८०६४०१४८), खारेगांव डीसीएच कक्ष प्रमुख – उपआयुक्त मनिष जोशी (मोबाईल ९१६७०४३६०६), उपकक्ष प्रमुख उपकर निर्धारक आणि संकलक मनोज तायडे ( मोबाईल ९१६७८९१९९९), ग्लोबल हॉस्पिटल कक्ष प्रमुख कार्यकारी अभियंता सदाशिव माने (मोबाईल ९९६९२०१६१८) उपअभियंता महेश रावळ (मोबाईल क्रमांक ९९३०८०९००८) उपअभियंता रुपेश पाडगावकर (मोबाईल ९९२०५४३३५५ ) तसेच पाकिंग प्लाझा कक्ष प्रमुख उपअभियंता अंजूम अहमद (मोबाईल ९८२१३७७६२२) यांची नेमणूक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com