डॉ आंबेडकर जयंतीचे निगेटिव नॅरेटिव !


डॉ आंबेडकर जयंती म्हणजे निव्वळ गर्दी-डांस-डीजे हे समीकरण जाणीवपूर्वक रुजविल्या जात आहे.

ध्यानात ठेवा !
जेव्हा तुमच्या सचेतन मेंदूंनी व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत माना टाकल्या होत्या आणि जेव्हा लोकशाही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी  संघर्ष करत होती अशा निर्णायक वेळी याच गर्दीने लोकशाहीचा गाड़ा ओढून धरला आहे! 

  • याच गर्दीने तुमच्या प्रकाशन संस्था जिवंत ठेवल्या आहेत...
  • याच गर्दीने शब्द, लेखण्या इतिहास जमा होण्यापासुन रोखल्या आहेत....
  • याच गर्दीने तुमची चळवळ जिवंत ठेवली आहे....
  • याच गर्दीने तुम्हाला मनुवादाच्या विरोधात तालीम उपलब्ध करुन दिली आहे....
  • याच गर्दीने तुम्हाला भाषणासाठी
  • लाख लाख रुपये देऊन बोलतं केलं आहे...
  • याच गर्दीसमोर भाषण करुन आज अनेक लाभार्थी सभागृहात पांढरे झब्बे घालून बसले आहेत...
  • याच गर्दीच्या जोरावर तुम्ही क्रांतीची गाणी विकून स्वप्नांचे इमले बांधत आहात....
  • सुजाण जन हो ! लक्ष्यात घ्या कि,  "गर्दी"  हा नॅरेटिव जाणीवपूर्वक रुजविल्या जात आहे. ....

 गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मिडियात असो की इतर कुठे ,
‘डॉ आंबेडकर जयंती म्हणजे गर्दी डांस डीजे’ एवढीच चर्चा होत आहे !  बामणवादी डावपेच ओळखण्यात सगळ्यात जास्त हुशार, वैज्ञानिक दृष्टिकोण जपणारा , ओबीसींपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या आंदोलनांना पाठिंबा देणाऱ्या फुले - आंबेडकरवादी समाजालाच उपदेशाचे डोस पाजले जात आहेत !    बरं , ही गर्दी काही थाळ्या वाजवणारी नाही. गॅलरीत येऊन दिवे पेटवणारी नाही, शेण गोमूत्र महोत्सव साजरी करणारी नाही किंवा दसऱ्याला शिवाजी पार्कवर येऊन कंबर मागेपुढे करुन नाचणारीही नाही !    ही गर्दी म्हणजे भक्ताड माकड़ांची फौज नसून या देशाला वैचारिक टॉनिक देणारी सकारात्मक समूहशक्ती आहे. ही गर्दी फक्त मेट्रो शहरातील रस्त्यांवर किंवा वातानुकूलित हॉलमधे संचारत नाही तर यूरोप, एशिया खंडापासून तर थेट देशाच्या संसदेपासुन, भारतातील प्रत्येक गांव, वस्तीतांडा, पाल पाडा, टेकड़ी , डोंगर माथा, माळरान, झोपड़पट्टी कामगार वस्ती, सगळीकडेच ती संचारत असते ! 

     म्हणून , आज श्वास घेता येतोय याबद्दल या गर्दीचे आभार माना !

- संतोष पगारे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या