कल्याण : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र रुग्णांची परवड होत असल्याचे भीषण चित्र आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी तरी नागरिकांना सर्व सुविधांसह उपचार मिळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. कोरोना महामारीच्या संकटात असलेल्या नागरिकांना योग्य वेळेत योग्य तज्ञांकडून उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असणे, तसेच आपत्कालीन स्थितीत जनतेला आरोग्य सेवेचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी मागणीही आरोग्य साहाय्य समितीने केली आहे.
रायगड जिल्ह्यातील १४ रुग्णालयांपैकी पनवेल, कर्जत, पेण, रोहा आणि माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयांत कोरोना उपचारांमध्ये आवश्यक असलेले व्हेंटीलेटरही उपलब्ध आहेत; मात्र वैद्यकीय अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर वेळीच उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून एकाच वैद्यकीय अधीक्षकांकडे २ ते ३ रुग्णालयांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आठवड्यातील ठराविक दिवस पदभार असलेल्या वैद्यकीय अधीक्षक, तसेच तज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी येण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत; प्रत्यक्षात मात्र त्या वेळेत ते डॉक्टर उपलब्ध होतातच असे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना आरोग्य सुविधा आणि उपचारांपासून वंचित रहावे लागत आहे.
ऑक्सिजन, इंजेक्शन आणि खाटांची पुरेशी अन् वेळेवर उपलब्धता नसल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील पाच उपजिल्हा आणि नऊ ग्रामीण अशा एकूण १४ रुग्णालयांपैकी केवळ महाड आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालय अन् श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथेच वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहेत. तर उर्वरित ११ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधीक्षक हे पद मागील काही वर्षांपासून अजूनही रिक्त आहे. त्याचबरोबर भूलतज्ञ, अस्थितज्ञ, शल्य चिकित्सक आदी महत्त्वाची पदेही रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून उपचारासाठी येणार्या रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच रुग्णांना आर्थिक हानी सोसून अन्यत्र उपचार घेण्याची वेळ येत आहे.

त्याचबरोबर या जीवघेण्या आजाराला सामोरे जाताना या कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील वाऱ्यावर सोडला असून त्यांना कोणताही इन्शुरन्स नाही, कोणत्याही सुरक्षेची काळजी नाही. त्यांना देण्यात येणारे सुरक्षा किट अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, मास्क व हॅण्डगलोजसारखे सुरक्षा कवच संबंधित शार्प सर्विसेस कंपनीकडून मिळत नाही. त्याचबरोबर आरोग्य तपासणी नाही, साप्ताहिक सुट्टी, कामावरून काढण्याची धमकी अशा अनेक मुद्यांवर कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपले तसेच आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असून त्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.आपल्या या मागण्यांसंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास या कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या