Top Post Ad

राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय  राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कोरोनाविरूद्धच्या लढ्याला देणार बळ..


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत राहिला आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होत्या.
राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे. आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या साहाय्यासाठी पक्ष नेहमीच तत्पर आहे.

दरम्यान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. प्रतिकूल स्थिती असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चोख काम करीत आहेत. सीरम किंवा भारत बायोटेककडून लसींच्या दरात केलेली कपातही नगण्य आहे. अशा स्थितीमध्ये मोफत लसीकरण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते नजीब मुल्ला, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व म्हणजे 33 नगरसेवकांशी चर्चा करुन तीन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीत वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 15 लाख रुपयांची गंगाजळी जमा होणार आहे, सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहे. केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरणासह अनेक बाबतीत सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारीचा वाटा म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पठाण यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com