Top Post Ad

संपूर्ण लॉकडाऊनचा शब्द टाळण्यात आम्ही यशस्वी झालो- काँग्रेस


 राज्यात  परिस्थिती आणखी गंभीर होवू नये यासाठी लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला जवळपास सर्वच मंत्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले. संपूर्ण कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत याढेळी चर्चा झाली.  कडक लॉकडाऊन लागू करण्याऐवजी आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यावर या बैठकीत एकमत झाले. सप्ताहाच्या शेवटी अर्थात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

लॉकडाऊन लागू केल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील नियमावली आज संध्याकाळी ते रात्री पर्यंत जाहिर करण्यात येणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी शनिवार व रविवार संपूर्ण दिवस सर्व मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट या गोष्टी बंद राहणार आहेत. तसेच चित्रपटगृह, नाट्यगृह ही बंद राहणार आहेत. शासकिय कार्यालयाबरोबरच खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कामगारांना त्यांच्या कारखान्याच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले असून एखाद्या ठिकाणी कामगार कोरोना पॉझिटीव्ह आले असेल त्याची काळजी घेवून त्याच्या कुटुंबियांची सदर उद्योजकांनी काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत,  त्याचबरोबर कामगारांवर कोणतेही निर्बंध राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याकालावधीत कोणत्याही स्वरूपात रेल्वे, बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे या सर्व सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात कोणत्याही स्वरूपाचे राजकिय कार्यक्रम करण्यास बंदी राहणार आहे. तसेच धार्मिकस्थळानाही पूर्वीप्रमाणे नियम लागू राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. राज्यात रूग्णांना रेमिडेस्विर इंजेक्शन उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन रूग्णांना सहजरित्या उपलब्ध होण्याकरीता मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे पुढील नियोजन करत असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव ठिकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन, यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपुर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आणि इतर मान्यवरांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की, वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्‍य आहे ती त्यांनी करादी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्‍य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी, कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू.

मुख्यमंत्र्यांचा आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचढण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांनी २४५७ लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणुक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्‍य आहे तिथे वर्क फ्रॉम होमच्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्‍त केल्या तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले. 

वैठकीत सुरुवातीला प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविडस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपायययोजनांची माहिती उपस्थितांना दिली. अनर्थ रोरवायचा तर अरधचक्र बाचित होते आणि अरधचक्क सुरु ठेवायचे तर अनर्थ होतो या कात्रीत आपण सापडले असून या रांकटकाळात मित्र तोच होऊन सोबत राहणे महत्वाचे अराते, राज्यातील ऊद्योग जगताचे नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शारानास आतापर्यंत मदत केली आहे. सहकार्य केले आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की, जिंदाल उद्योग रामृहाने पुढे येऊच ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी शारानाला राहकार्याची भूमिका घेतली आहे. बाबा कत्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखतली आहे. ही मदत अमृल्य आहे. काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लस्सीकरण वेगाने करत आहोत आहोत. केंद्राकडे तशी  विनंतीही केली आहे. आपल्याच राज्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य प्रशासन किमान आठ ते ११ दिवस संपूर्ण लॉकडाऊन करावे या भूमिकेत होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. लोकांचे रोजगार पुन्हा जातील, हवे तर निर्बंध कठोर लादा, हाॅटेल, माॅल्स, थिएटर, चाैपाट्या आदी गर्दीची केंद्रे बंद करा, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. लॉकडाऊनमध्ये जिल्हा वाहतूक बंद होते. परिणामी बाजार समित्या ठप्प होतात. त्यात कृषी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हवे तर रात्रीची संचारबंदी करा, पण संपूर्ण लॉकडाऊन नको, असा सूर राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांनी लावला. रविवारची बैठक बैठक व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे झाली. या वेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी तर इतर मंत्री आपापल्या निवासस्थानी किंवा मंत्रालयातील कार्यालयात होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सरकारच्या कठोर निर्बंधांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची विनंती केली. 

 काँग्रेसचा टाळेबंदीस विरोध होता, असे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. सरकारने जनतेच्या मागण्या विचारात घेऊन मिनी लाॅकडाऊनचा सुवर्णमध्य काढल्याचे गृहनिर्माण विकास मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.  माेदींच्या संपूर्ण लॉकडाऊनवर आम्ही कायम टीका करत आलो आहोत. हा विषय भावनिक होता. कारण, त्याचा नागरिकांवर मोठा मानसिक परिणाम होतो. तो संपूर्ण लॉकडाऊनचा शब्द टाळण्यात आम्ही यशस्वी झालो, असे एका काँग्रेसच्या मंत्र्यांने सांगितले. दरम्यान, तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन कामगारांची जबाबदारी उद्योजकांनी घेण्याचे आवाहन केले. याला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com