रायगडमध्ये रेमेडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम

 


 गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमेडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे.कारण कोरोना रूग्णांच्या उपचारात रेमेडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आलं होतं. मात्र, रायगडमध्ये घडलेल्या घटनेमुळं आता रेमेडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मागील काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमेडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आली आहे. रायगडमध्ये इंजेक्शनच्या वापरामुळं अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 बाॅटल पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आलं होतं. त्यापैकी 90 रुग्णांवर या इंजेक्शनचे दुष्परिणाम झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणं दिसून आली होती. मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं आता संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमेडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याला दुजोरा दिला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ,रेमेडेसिविर इंजेक्शनमुळं कोरोनाच्या रुग्णांना खात्रीशीररित्या फायदा होईलच असं सांगता येत नाही, हे डॉक्टरांनी वेळोवेळी सांगूनही अनेकजण रेमेडेसिविरच्या वापरासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच राज्यात रेमेडेसिविर इंजेक्शनची मागणी अचानक वाढली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA