Top Post Ad

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टा परिवाराचे सामाजिक भान !

ठाणे : ब्रह्मांड कट्टा हा सांस्कृतिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहीला आहे. सामाजिक जाणीव  ठेवून नेहमीच मदतीचा हात पूढे करीत आलेला आहे.  सौ.श्रध्दा देसाई व श्री.प्रमोद कांबळी  हे 'स्वरश्री प्रतिष्ठान' ही संस्था चालवत आहेत. अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर व कर्करोग पीडीतांच्या आर्थिक व शैक्षणिक मदतीसाठी सदर संस्था ही धर्मादाय आयुक्त मान्यताप्राप्त ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या  माध्यमातून 'आनंदयात्री' या नावाने  अंध,अपंग, मतिमंद, मूकबधिर अशा कलाकारांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ देऊन संपुर्ण देशात ही संस्था कार्यक्रम करीत असते. आतापर्यंत ७०० प्रयोग या संस्थेतर्फे झाले आहेत. या प्रयोगांचे माध्यमातून व देणगीतून संस्थेचा खर्च निभावला जातो. दिव्यांग असुनही आपल्या कलेच्या जोरावर उदरनिर्वाह व शैक्षणिक गरजा भागवणार्‍या मुलांचे प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. रसिक प्रेक्षकांच्या योगदानामुळे या संस्थेने इथवर यशस्वीरित्या प्रवास केला आहे. 

मात्र कोरोना काळात कार्यक्रम पूर्णपणे थांबले असल्याने या दिव्यांग मुलांवर हालाखीची परिस्थिति आली आहे.आवश्यक असणारे अन्नधान्य, वैद्यकीय, शैक्षणिक व ईतर आवश्यक खर्च भागवताना संस्थेला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे  प्रतिपादन सौ. श्रध्दा देसाई व श्री.प्रमोद कांबळी यांनी केले होते. यासंबधी माहिती ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांना कळताच त्यांनी ताबडतोब संस्थेला मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. आपल्या कार्यकारी समिती व सदस्यांच्या मदतीने त्यांनी जवळजवळ २५००० रुपये रोख रक्कम  जमा केली. ही रक्कम जमा करण्यात ब्रह्मांड कट्टा अंतर्गत संस्था ब्रह्मांड संगीत कट्टयाचा सिंहाचा वाटा होता. अध्यक्ष अरुण दळवीच्या मार्गदर्शनाखाली संगीत कट्टयाच्या सदस्यांनी सढळ हस्ते मदत करत मोलाचे योगदान दिले. 


ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या सदस्या सौ. तन्वी हुलावले यांनी अन्नधान्य व भाजीपाला या स्वरुपात मदत केली. अशी भरघोस मदत ब्रह्मांड कट्टा परिवार तर्फे स्वरश्री प्रतिष्ठानमधील दिव्यांग मुलांना सुपूर्त केली गेली. कोरोनाने माणसामाणसांतील अंतर वाढवले परंतु मनामनातील अंतर कमी करा हा सुंदर मानवतेचा संदेश देणार्‍या संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी जनतेला देखील या संस्थेला यथाशक्ति सहकार्य करण्याचे आवाहन केले व ब्रह्मांड कट्टयाने यावर्षीदेखील पुनश्च सामाजिक भान ठेवत समाजकार्याचा ध्वज फडकवला!

 गेल्या वर्षी ग्रुपचा सभासद गायक मंगेश भोईर कोरोनाग्रस्त असताना सत्तर हजारांची मदत करुन संगीत कट्टयाच्या सभासदांनी त्याला आर्थिक विवंचनेतुन सोडवले तसेच जिवावरच्या संकटातुन ते वाचले. कलेविषयी आसक्ती असल्याने उभरत्या कलाकारांसाठी ब्रह्मांड कट्टा हा एक आधारस्तंभ ठरत आहे. कोरोनाकाळात तर उदरनिर्वाहाच्या संकटाचे चटके सोसणार्‍या कलाकारांसाठी ब्रह्मांड कट्टा नेहमीच मायेची व मदतीची सावली होऊन भक्कमरित्या उभा आहे. अशाप्रकारे परत एकदा ब्रह्मांड कट्ट्याने माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com