चार हजाराहून अधिक थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने केली जप्तीची कारवाई


ठाणे 

 ठाणे महानगरपालिकेने सन 2020-21 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर न भरलेल्या सुमारे 4312 थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई  केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्यावतीने दंडाच्या रकमेत सवलत दिली होती. तरीही अनेक नागरिकांनी कर न भरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  महापालिकेने थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला असून, सर्व प्रभाग स्तरावरुन एकूण 4312 मालमत्ताना जप्तीची कारवाई करण्यांत आली आहे. यामध्ये व्यवसायिक गाळे सील करण्यात आले आहेत.  मात्र  मालमत्ता करापोटी रुक्कम   रु . 624.78 कोटी इतका महसूल ठाणे महापालिकेने जमा केला आहे.  नागरिकांनी आपला कर भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता करासाठी रु. 683 कोटी इतका अर्थसंकल्पिय इष्टांक देण्यांत आला होता. परंतु मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, यामुळे सर्वांचे उद्योगधंदे बंद झाले होते, या परिस्थ‍ितीचा विचार करुन महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या करापोटी आकारण्यात आलेली दंडाची रक्कम माफ करुन नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले होते. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे आपण चांगल्याप्रकारे करवसुली करु शकलो यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य पध्दतीने नियोजन करुन सुट्टीच्या दिवशी व ऑनलाईन करभरणा सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण करवसुलीचा इष्टांक पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

    मागील वर्षी रक्कम रु. 502 कोटी इतका कर वसूल झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच  म्हणजेच माहे  एप्रिल,2020 ते जुलै,2020 अखेर पर्यत कोव्हिडचा कालावधी वगळता केवळ 245 दिवसाच्या कालावधीमध्ये मालमत्ता कराची देयके जनरेट करणे, वितरित करणे,    वसुलीकरिता पाठपुरावा करणे, इत्यादी कामकाज मालमत्ता कर कार्यालयाकडील अधिकारी/ कर्मचारी यांनी पार पाडले असून, मागील वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ असणारी चालू आर्थिक वर्षात  सुमारे रक्कम रु. 122.78 कोटी इतका जादा कर वसूल झाला आहे.  तसेच जे करदाते थकीत रक्कमेसह चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या करासह दुस-या सहामाहिची रक्कम जमा करतील अशा  करदात्यांना त्यांच्या मालमत्ता कराच्या देयकातील  सामान्य करामध्ये  सवलत देण्याबाबत (अली बर्ड योजना ) धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या  सवलत योजनेस करदात्यांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुमारे 180258 इतक्या करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  या कालावधीमध्ये  रक्कम रुपये 241.52 कोटी इतका मालमत्ता कर जमा आहे.

त्याचप्रमाणे जे निवासी करदाते दि.1 जाने,2021 ते दि.31 मार्च,2021 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या रक्कमेवर 100%  सवलत योजना राबविण्यात आली. सदर सवलतीचा 113528 इतक्या करदात्यांनी लाभ घेतला असून, त्यापोटी रक्कम रुपये 13.86 कोटी इतकी रक्कम सूट देण्यांत आली आहे. याशिवाय सन 2020-21 या आर्थिक वर्षात 2487 नविन मालमत्तांची कर आकारणी पूर्ण करण्यांत आली आहे.  पुढील आर्थिक वर्षातही सदर काम मोठया गतीने करण्यांत येणार आहे.  तरी नवीन मालमत्ताधारकांनी कर आकारणी करुन घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासह त्या-त्या प्रभाग समिती कार्यालयात जमा करावीत.  सन 2021-22 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके माहे एप्रिल,2021 च्या दुसऱ्या सप्ताहात जनरेट करुन साधारणत: दिनांक 15 एप्रिल,2021 पर्यत सदरचे देयके प्रभाग समितीनिहाय कर संकलन केंद्रावर तसेच Online पध्दतीने महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्याचे नियोजीत आहे. त्याचप्रमाणे सदरचे देयके प्राधान्याने प्रिंन्ट करुन, ती करदात्यांना  पोहोचविण्याचेही नियोजन करण्यांत येत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA