Top Post Ad

राबोडीतील XOYO Bar HUKKA & Club वर ठाणे पीटा विभागाची रेड


 ठाणे राबोडी पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या XOYO Bar HUKKA & Club ( Old Name Hotel United 21) वर ठाणे AHTC (पीटा) विभागाने रेड केली असून  100 जणाच्या वर कारवाई करण्यात आली आहे. XOYO क्लब व हॉटेल मंगेश नावाचा इसम चालवत असून हया  “ मंगेश ”  नावाच्या इसमाचे ठाणे पोलीस आयुक्ताल्या मध्ये ठाणे स्टेशन जवळील नागरिक स्टोअर्स  येथे “ रवि क्लब ” , रॉयल चॅलेंज हॉटेल च्या गल्लीत “ केशव क्लब ” नावाचे  मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे  चालतात.  सदर क्लबला  अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्याचा  “ आर्थिक ” आशिर्वाद  असल्या बाबतची माहिती सुत्रानी दिलेली आहे.  त्यामुळेच XOYO हुक्का क्लब व त्याचे इतर जुगाराचे अड्डे हे कोरोना सारख्या भयंकर साथ रोगात पण जोरदार चालू असल्याचे दिसत आहे.  आज माननीय ठाणे पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशावरुन XOYO हया हुक्का क्लब वर रेड करण्यात आली . मात्र  “ मंगेश ” नावाच्या इसमाच्या इतर जुगार अड्यावर पोलीस आयुक्त साहेब कारवाई करतील का ? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

 कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करण्राया आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी  दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून मागील महिन्यात कारवाई केली.  मात्र ही कारवाई तकलादू आणि दिखाऊ असल्याची चर्चा ठाण्यामध्ये रंगली आहे. कारण एवढी कारवाई होऊनही ठाण्यामध्ये अद्याप जैसे थे परिस्थिती आहे. आजही ठाण्यामध्ये बहुतेक बार आणि हुक्का पार्लर कोरोनापूर्व काळातील परिस्थितीनुसारच सुरु आहेत. यावर कोणाचाही अंकूष नाही. घोडबंदर रोड, तीनहात नाका, वर्तकनगर आदी ठिकाणी अद्यापही लेडीजबार आणि हुक्का पार्लरचा हैदोस सुरु आहे. मात्र याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.  इतकेच नव्हे तर यासोबत मटका आणि जुगाराचे अड्डेही पुर्ण जोमाने सुरु आहेत. ठाणे स्थानक पूर्व-पश्चिम, कोपरी, कळवा, नितीन कंपनी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर रोड आदी परिसरात हे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कोणत्याही प्रशासनाचा अंकूष नसल्याने या परिसरातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करण्राया दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करून पाचही बार मागील महिन्यात सील केले. नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली.  त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार सील केले. या कारवाईनंतरही अनेक बार जैसे थे सूरु असल्याने ठाण्यातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com