अमेरिकास्थित विकासक करणार कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गुंतवणूक

 कुलाबा झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता
७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास अमेरिकास्थित विकासक इच्छुक
राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष


मुंबई
मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुलाबा येथील एसआरए प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका स्थित ट्रिनिटी व्हाइट सिटी वेंचर या विकासकाने तब्बल ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत या ठिकाणी जागतिक दर्जाच्या इमारती बनविण्याची तयारी दर्शविली असून तसे इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट)  या विकासकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व श्रीगणेशमूर्ती नगर कफ परेड बॅकबे रेक्लेमेशन एसआरए  हौसिंग सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व गृहनिर्माण खाते हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.  

 कुलाबा येथे ७ हजार कुटुंब सध्या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या ७ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अनेक वर्षापासून रखडले आहे. मागील ३  ते ४ वर्षापूर्वी एका बड्या विकासकाने बनावट कागदपत्रे तयार करून या स्थानिक झोपडपट्टी रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. या विकासकाला दूर सारत स्थानिक झोपडपट्टी वासियानी गृह संस्थेची स्थापना करीत नव्याने एस आर ए प्राधिकरण यांच्याकडे इरादा पत्र मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या कुलाबा येथील झोपडपट्टीच्या पुनर्वसन करण्यासाठी अनेक विकासक पुढे शक्यता याबाबत निर्णय घेण्यासाठी नुकताच चर्चगेट येथे झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत अमेरिका येथील ट्रिनिटी व्हाइट सिटी वेंचर यांनी तब्बल ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून त्याबाबतची  घोषणा हजारो झोपडपट्टी वासियांच्या उपस्थितीत केली . तसे इरादा पत्र या विकासक कंपनीने संस्थेचे प्रमुख सल्लागार विनायक वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केले. भाजप सरकार सत्तेत असताना कुलाबा झोपडपट्टीच्या पुनर्वसन करण्याचा मुद्दा गाजला होता. ७ हजार झोपडपट्ट्या या विभागात आहेत. त्यापैकी ५ हजार पात्र झोपडपट्टी धारक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. भाजप सरकारच्या काळात    मात्र त्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आता मात्र ठाकरे सरकारच्या काळात हा पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होणार अशी आशा स्थानिक झोपडपट्टी वसियानी व्यक्त करीत आहेत. 

कुलाबा झोपडपट्टी चे पुनर्वसन करण्यासाठी अनेकवेळा सरकार दरबारी मागणी करूनही याबाबत निर्णय न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व श्रीगणेशमूर्ती नगर एस आर ए गृहनिर्माण संस्था नियोजित या संस्थेची विशेष सर्वसाधारण बैठक पर पडली या बैठकीत ट्रिनिटी व्हाइट सिटी वेंचर चे संचालक गलवा, उद्योगपती मीगलानी, अविराज ग्रुप चे विजय ठाकरे , कोल्हापूर चे उद्योजक संभाजी देसाई , मार्गदर्शक शरदजी गावकर , वडाळा आनंद नगर एस आर ए चे मुख्य प्रवर्तक व्दारकानंद पाटील , मुख्य प्रवर्तक प्रकाश घाडगे , प्रवर्तक प्रशांत घाडगे आदी उपस्थित होते. या बैठकीत ट्रिनिटी चे संचालक यांनी हा पुनर्वसन प्रकल्प राबविण्याची घोषणा केली त्यास स्थानिक उपस्थित हजारो झोपडपट्टी धारकांनी अनुमोदन दिलेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA