वासिंद ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी

 साई ईश्वर गृह प्रकल्प घरपट्टी प्रकरण
पंचायत समिती सदस्याने उपोषणाचे पत्र देताच वासिंद ग्रामपंचायतीने पत्करली शरणागती


शहापूर
मागील दोन महिन्यांपासून शिवसेनेचे वासिंद गणाचे शहापूर पंचायत समिती सदस्य राजेश बाबू सोनवणे यांनी वासिंद पूर्व येथील वादग्रस्त साई ईश्वर गृह प्रकल्पा बाबत लेखी पत्रव्यवहार करून  पंचायत समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे लक्षात येताच एक मार्च २०२१ रोजी राजेश सोनवणे यांनी  जोपर्यंत वासिंद ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करणे तसेच घरपट्टी रद्द करणे व सांडपाण्याचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत मी दिनांक ४ मार्च पासून पंचायत समिती आवारात उपोषणास बसणार असे लेखी निवेदन गटविकास अधिकारी शहापूर यांना देताच शिवसेनेची सत्ता असलेल्या वासिंद ग्रामपंचायतीने सोनवणे यांना पत्र दिल्याने सदरचे उपोषण स्थगित केल्याची माहिती राजेश सोनवणे यांनी दिली आहे.

शहापूर तालुक्यातील वासिंद ग्रामपंचायत हद्दीतील वासिंद पूर्व येथे सर्व्हे नंबर १०१/५ क्षेत्र ६५ गुंठे या जागेत ओमसाई कन्स्ट्रक्शन चे मालक मोहन के. कृष्णवंशी या विकासकाने ११० सदनिका असलेला साई ईश्वर नावाने गृह प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प वादग्रस्त असून जागेचे मालक सुनिल राजाराम बजाज यांनी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी कोर्टात केस दाखल केली आहे. त्यामुळे विकासक व जागा मालक यांचेत कोर्टात वाद सुरू आहे. तसेच त्यांनी या सदनिकेस घरपट्टी मिळणेसाठी ग्रामपंचायतकडे अर्ज केला असता, उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने याचिका क्रमांक २८२२४/२०१९ अन्वये आपणांस घरपट्टी आकारणी,  करू शकत नाही असे पत्र २२ नोव्हेंबर २०१९ रोजी जागा मालक सुनिल बजाज, स्वप्ना रघुनाथ मुकणे तसेच विकासक मोहन के. कृष्णवंशी आणि माहितीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर  यांना देण्यात आले होते. 

 त्या पत्रात विकासक कृष्णवंश याने विकास करारनाम्यानुसार बांधकाम सुरू केले परंतु वासिंद ग्रामपंचयतकडून कोणतीही बांधकाम  परवानगी न घेता बांधकाम केले आहे त्यामुळे विकासाकस कोणत्याही प्रकारचे एन.ओ.सी. आकारणी व दाखला देता येणार नाही असाही स्पष्ट उल्लेख केला आहे. असे असतांना सरपंच लता शिंगवे आणि ग्रामविकास अधिकारी ऐ. जे. थोरात यांनी न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत २८ऑक्टोबर २०२० रोजी ११० सदनिकांना घरपट्टी आकारली असून विकासक मोहन कृष्णवंश यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२० रोजी केलेल्या अर्जावर ग्रामविकास अधिकारी ऐ. जे. थोरात यांनी शेरा मारला आहे की, सदनिकेबाबत हरकती आल्यास घरपट्टी रद्द करण्यात यावी. ही बाब शहापूर पंचायत समिती सदस्य राजेश सोनवणे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विस्तार अधिकारी आर.पि. महाले तसेच वासिंद ग्रामपंचयत यांना लेखी पत्रव्यवहार करून लक्षात आणून दिले होते. मात्र दोन महिने झाले तरी  न्याय मिळत नसल्याचे तसेच पंचायत समिती प्रशासन या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे लक्षात येताच एक मार्च २०२१ रोजी राजेश सोनवणे यांनी  जोपर्यंत वासिंद ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेवर कार्यवाही करून गुन्हा दाखल करणे तसेच

घरपट्टी रद्द करणे व सांडपाण्याचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत मी दिनांक ४ मार्च पासून पंचायत समिती आवारात उपोषणास बसणार असे लेखी निवेदन गटविकास अधिकारी शहापूर यांना दिले होते. वासिंद ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता आहे व तक्रारदार पंचायत समिती सदस्य देखील शिवसेनेचे आहे. त्यामुळे हा घरचा आहेर स्वीकारत वासिंद ग्रामपंचायत सरपंच लता शिंगवे यांनी ३ मार्च रोजी " दहा दिवसांत वादग्रस्त विषयावर ग्रामपंचायत कमिटी एकत्र बसून या समस्यांवर योग्य तो निर्णय घेऊन सदरचा निर्णय आपणास लेखी कळविण्यात येईल  तरी सदरचे उपोषण स्थगित करावे असा उल्लेख असलेले लेखी पत्र राजेश सोनवणे यांना दिले. पत्रानुसार सोनवणे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले असून १० दिवसांनंतर सकारात्मक निर्णयाचे पत्र न मिळाल्यास उपोषणास बसणार असे सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA