ढाका विमानतळावरच प्रधानमंत्री मोदींचा विशेष सत्कार, ढाका विद्यापीठात निषेधार्थ आंदोलन


बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या स्वातंत्रदिनानिमित्त होणार्‍या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी दोन दिवसाच्या दोर्‍यावर पोहचले. ते शुक्रवार सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आपल्या विशेष विमानाने ढाकाकडे रवाना झाले होते. त्यानंतर त्यांचे विशेष विमान हे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ढाका येथील हजरत शहा जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.  त्यांचे स्वागत करण्यासाठी बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना या उपस्थित होत्या. याप्रसंगी विमानतळावरच  मोदी यांना 'गॉड ऑफ ऑनर' देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रित करण्यात आले.  बांगलादेश स्वातंत्र्य लळ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवझाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे  मोदी म्हणाले. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला  अटकही झाली होती, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली. बांगलादेश स्वातंत्र्यलळ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकार्‍यांनी  बांगलादेडाच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले

मात्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ ढाकामध्ये प्रचंड आंदोलन झाले. ढाका विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये दोन पत्रकार अणि सरकारचा पाठिंबा असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या (बीसीएल) दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ढाका विद्यापीठ परिसरात गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलन विविध डाव्या-पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या 'प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्स'च्यावतीने करण्यात आले होते. 

त्यावेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'प्रोग्रेसिव्ह स्टुडंट अलायन्स'च्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधात वीसी चत्तर भागात आंदोलन सुरू होते. सत्ताधारी पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे. या आधी काल गुरुवारी देखील मोतीझील भागात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात 'जुबो अधिकार परिषदे'च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA