त्यानंतर_काय_झालं ?


फडणवीसांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती.
याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षचे नेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. पण त्यानंतर काय झालं ?

● गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. ..................*त्यानंतर काय झालं ?*
● फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. ..................*त्यानंतर काय झालं ?*
● अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. (काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल) ..................*त्यानंतर काय झालं ?* ◆ *हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला.*
● याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली. ..................*त्यानंतर काय झालं ?* ● २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतलं. विधानपरिषदेतून आमदार केला आणि आता ते विधानपरिषदमध्ये भाजपचे विरोधीपक्ष नेता आहेत.
● मुख्यमंत्री असतांना मामुनीं 'शिक्षकांची वेतन बँक खाती' मुंबई बँकेत वळवली... नंतर आधी हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली.
*त्यानंतर काय झालं ?*
● याच सभागृहात कृपाशंकर सिंघ यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले.
*त्यानंतर काय झालं ?*
● विरोधी पक्षाचा नेता असतांना कृपाशंकरच्या घोटाळ्याची कागदं नाचवली. पण स्वत: मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये; असं प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला.
*त्यानंतर काय झालं ?*

*अशी अनेक उदाहरण देता येतील.*
ते मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो... (विशेषतः गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल)... अनेक उदाहरण.
■ एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण (?) भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
■ २०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे.
त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी.. मी करत आकांडतांडव करत आहेत; ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये.
उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला.
*मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे; याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे.*
असो, अनेक *भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.*
बाकी भक्तांबद्दल तर आपलं ठरलंच आहे,
*आपण फक्त त्यांची मजा बघायची.*
दिपक पांडुरंग जाधव (फेसबुक वॉल)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad