माळी कामगार म्हणून भरती झाले आणि बनले उद्यान अधिकारी


वृक्ष लागवड प्रकल्पाची चौकशी करण्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची विधानसभेत मागणी केली असल्याने  मनपाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी किती झाडे लावली व त्यातील किती झाडे जगली याची होणार चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्रात सुमारे 28 कोटी वृक्ष लागवड गेल्या 5 वर्षात करण्यात आली आणि त्यातील 75% झाडे ही जगली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. तर या सगळ्याची माहिती 31 मार्च आधी चौकशी समिती स्थापन करून करण्यात येणार असुम 6 महिन्याच्या आत यासंबंधीचा अहवाल मागावणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वासन दिले. सदर चौकशी समिती नवी मुंबईत सुद्धा येणार असून गेल्या काही वर्षात नवी मुंबई पालिकेतील उद्यान विभागाने काय दिवे ( झाडे ) लावले याची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे सलाईन वर असलेल्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत.....

सुरवातीला माळी कामगार म्हणून भरती झालेले हे सध्याचे काही अधिकारी प्रत्यक्ष उद्यान अधिकारी कसे झाले आणि यांना कशी काय बढती दिली गेली असे अनेक प्रश्न काही पर्यावरण प्रेमी यांनी वेळोवेळी विचारले असून सध्याचे आयुक्त अभिजित बांगर आता या उद्यान विभागातील सावळा गोंधळ कसा हाताळणार व सरकार मान्यताप्राप्त ( कृषी विद्यापीठ ) डिग्री असलेल्या जाणकार माणसांच्या हातात विभाग सोपावणार का? असा प्रश्न नवी मुंबईतील नागरिक विचारत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या