Top Post Ad

जिलेबीच्या कांड्यां आणि धंद्याला लागलेले सत्ताधारी आणि विरोधी


मुकेश अंबानीच्या अँटिलीया या आशिया खंडातील सगळ्यात भारी मजबुत आणि टिकाऊ अश्या गगनचुंबी इमारत कम घराच्या भोवती कोण्या भुरट्या मुसलमानांच्या नावाची आतंकवादी संघटनेने जिलेबीच्या काड्या असलेली पिशवी चोरीच्या स्कॉर्पिओ गाडीत ठेवली होती.  अंबाणीचे बेवफादार आणि देशद्रोही सेक्युरिटी वाले घोडे पालथे पाडून आणि मजबूत दारू पिऊन झोपी गेलेले असतानाच त्याचा फायदा घेऊन  ती चोरीची स्कॉर्पिओ गाडी हळूच आवाज न होता ढकलत ढकलत  रात्रीच्या अडीच वाजताच्या सुमारास अंबाणीच्या घराच्या थोडी जवळ पार्क करण्यात आली, आता सगळे शेकुरिटी झोपलेले असल्यावर शी शी टीव्ही कोण बघणार ? त्या गाडीत असलेली २ माणस चालत चालत निघून गेली, आणि एक जण गाडीतच राहिला, मग कोणीतरी PPE किट घातलेला माणूस पांढऱ्या इनोव्हा गाडीतून उतरला त्या स्कॉर्पिओ कडे गेला काहीतरी बोलला, मग तो किट घातलेला माणूस परत त्या इनोव्हा मधून ठाण्याच्या दिशेने निघून गेला.  ग तो स्कॉर्पिओ मधला माणूस पण रात्रीच जागरण त्यात चहा नाय का नाष्टा न्हाय का बिडी शिगारेट न्हाय मग काय ?वैतागून त्या जिलेबीच्या काड्या न वापरताच गाडीच्या मागच्या दरवाजाने निघून गेला...... (आता तो ठाण्याकड गेला का कुठं गेला ते काही सांगून गेला नाही)

झोपलेले आय झेड प्लस शिकुरिटी बेवफादार उठले आणि झाली बोंबाबोंब सुरू, आता त्या गाडीत नक्की काय होत नव्हतं तरीही ते शोधायला बॉम्ब पथक आलं (केंद्रातून नाही राज्यातून) मग त्या जिलेबीच्या काड्या काढल्या आणि तपासायला सुरवात झाली. सगळ्या देशाच्या बेवफा मीडियावर एकच बातमी अंबाणीच्या घराखाली स्फोटकाने भरलेली गाडी जप्त वगैरे वगैरे . इतकी कडक गांजा मारून बातमी रंगवली की अंबाणीची सुद्धा फाटून हातात येईल इतकी कडक बातमी ....

बाकी त्या जिलेबीच्या काडीने अंबाणीच काय अंबाणीच्या घरच्या बुल्लेट फ्रुप शेकुरिटीचा खालचा आणि वरचा एक केस पण भाजणार न्हाय....हे अंबानीला लगेचच कळलं त्यामुळे तो बिचारा आपल्या रोजंदारीच्या काम धंद्याला रोज न चुकता डब्बा घेऊन जायला लागला .... आणि इथं सगळ्या देशाला आणि राज्याला मीडियाने धंद्याला लावलं... आता मात्र तपास सुरू झाला, चोरीच्या स्कॉर्पिओवाल्या गाडीच्या मूळ मालकाला अर्थात हिरेण ह्याला शोधून विचारपूस वजा धमकी अस सगळं झालं, या सगळ्यात एक मोठा पोलीस अधिकारी सचिन वाझे जिथं तिथं जातीने हाजीर असायचा, इतक्यात हिरेन आणि वाझे भेटले वगैरे अस सगळं सुरू झाल (हे पण मिडियानेच सांगितलं नाहीतर आम्हाला काय केळ कळतंय यातलं ???)


मग अचानक मध्ये भयानक एक दिवस ह्या स्कॉर्पिओ मालकाची डायरेक्ट डेड बॉडी मुंब्रा खाडीत सापडली .....
मौका ए वारदात पे फिर वाझे भाऊ हजर ...
पार पोस्टमॉरटम होईपर्यंत कळव्याच्या राजे शिवाजी इस्पितळात भाऊ तिथंच...
हिरेन ची पत्नी भाऊ सगळे म्हणाले की आमचा माणूस आत्महत्या करूच शकत नाही....
(त्यात हिरेन ज्या कंपनीचा मास्क घालून गेले होते त्या ऐवजी त्यांच्या तोंडाभोवती नवीन कोरे करकरीत 4-5 रुमाल बांधलेले आढळले)

मग मात्र हे सहन करण्याच्या पलीकडं गेलं, अंबानी काही बोलना, ना अजून कोणी काही बोलत नाही म्हणून, 105 गडी निवडून आलेल्या विरोधी पक्षांनी अर्थात देशभक्तीचा विडा ज्यांनी चावून चावून चोथा करून सुद्धा आताच विडा खाल्लाय या अविर्भावात सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र आणि परत सकाळ अश्या 24 तासांपैकी 18 तास दुट्या करणारे परदर्शकतेचे पहारेकरी असलेले भाजप वाले उर्फ कमळाबाई फेम यांनी डायरेक्ट मोदी शहाला न विचारताच ही अक्खी केसच आपल्या हातात घेतली.... जस ब्राह्मनाला सोबतीला खांद्यावर बंदूक ठेवून अचोक निशाना लावायला एखादा क्षत्रिय कमी मराठा लागतो असाच प्रहार वाल्या राणेंच्या पोराला जोडीला घेतल त्यात आपसूक विधिमंडळ अधिवेशन आलं आणि....आपल्या मामीचा मा.मु (माजी मुख्यमंत्री) अंबाणीचा पाळीव वकील असल्याच्या अविर्भावात आपल्या जातभाई आणि वर्णव्यवस्था शाबूत राहावी म्हणून मरोस्तोवर काम करणाऱ्या संविधांनविरोधी अधिकारी यांच्याकडून घृह खात्याची सगळी इंथंबूत माहिती गोळा केली आणि महाविकास आघाडीला केळ रताळ सभागृहात भाजून खायची वेळ आणली.  हे आता हाताच्या घडीच्या आणि पंजाच्या बाहेर जातंय म्हणून की काय राज्याच्या घृहमंत्रीने ATS चा धनुष्य वापरून सभागृहात वेळ मारून नेली...

पण हे पण 105 आहेत गप्प कशे बसतील ??? शेवटी ते RSS च्या मुशीतून तयार झालेले सच्चे होमो हवन वाले देशभक्त हायेत...  त्यांनी पण नेहले पे देहला फेका,  तुम ATS तो हम NIA  आता बोला ???
लगेच NIA ची टीम हजर जशी काय आधीच दिल्लीतून आणुनच ठेवली होती, जागेवर वाझे दादाला अटक लगेचच कोर्टात, लगेचच टॉर्चर शूरु,
आता महाविकास आघाडी मग चांगलीच भानावर आली....

(मध्ये काय तो डायरेक्ट NIA येऊ नये म्हणून कोणता तरी कायदा पास केला होता तो ह्यात लागू का नसन झाला बरं ??? ) असुद्या मरुदया आपल्याला काय करायचंय .... "जिसकी सत्ता उसका खलबत्ता" ह्या म्हणीला विकासाच गाजर दाखवून विरोधकांनी काठावर पास असलेल्या 3 सपास विध्यार्थ्यांना कात्रज सह्याद्री कशेडी सगळेच घाट एकदाच दाखवले .......  आता मात्र सत्ता विपक्ष सगळेच भानावर आलेत बैठकांवर बैठका, खलबते, पत्र परिषदा, आरोप प्रत्यारोप, चिखलफेक, बस्स आता आई बहिणीच काढायची बाकी राहिलीय ते ही लवकरच पाहायला मिळणार.  बाकी हे सगळे खलबत्ते खालून कुटून कुठून कुठून काढायची वेळ एकट्या अंबानीने राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधकांवर आणली आणि स्वतः मस्त ऐश मध्ये जगतोय ह्याला म्हणतात "पाव्हण्याच्या काठीने साप मारणे"

राजकारण खेळायचं तर अस ......
आता मात्र महाविकास आघाडीची "आपलीच मोरी आणि मुतायची चोरी" अशी अवस्था झालीये...
आज कधी नव्हे इतकी जातीय धार्मिक आणि राजकीय तेढ भाजपच्या कमरेखालच्या धार्मिक राजकारणामुळे राज्यातच नाही तर देशात निर्माण झालीय....
उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि आता आसाम आणि पश्चिम बंगाल येथे सुद्धा हेच पाहायला मिळतंय..... Rss, जनसंघ आणि भाजप यांची सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बांधिलकी गांधी कुटुंबीय, शरद पवार, बाळ ठाकरे, लालू यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि इतर देशातील नेत्याना माहीत नाहीये का ??? की ही वरील मंडळी राजकीय स्वार्थासाठी बोळ्याने दूध पिण्याचं नाटक करत आहे ???? एक देश एक पक्ष ही गंभीर वाटचाल लोकशाहीतील सत्तेचे विकेंद्रीकर या मूल्याला आणि लोकशाहीला किती घातक आहे हा विसर देशातल्या राजकारन्याना पडलाय का ???  तसच देशातील 1% लोकांकडे देशातील 90% मालमत्ता आणि संसाधने गेल्यावर काय होऊ शकत याचा अभ्यास आपल्या SECULAR म्हणवणाऱ्या राजकारण्यांनी केलेला नाहीये ???

आज अंबाणीच्या निमित्ताने राज्यात जो काही तमाशा सुरू आहे तो तमाशा हा सरळ सरळ राजकीय सत्तेसाठी नसून सांस्कृतिक आणि विषमतावादी सामाजिक उतरंड अधिकाधिक घट्ट व्हावी म्हणून आहे हे न कळण्याइतके चुत्या आम्ही लोक तरी नाही आहोत तुम्हाला व्हायचं असेल तर खुशाल आपली तिकडेच परसाकडे xxx... एका साध्या घटनेचा ज्यात अंबाणीच्या घरच्या अथवा बाहेरच्या कोणाचीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही (मनसुख हिरेन सोडले तर ).  राज्याचे सत्ताधीश आजवर कधीही केंद्राच्या समोर असे उघडे पडले नव्हते   किंवा आजवर कधीही भाजप सोडून कोणत्याही राज्य अथवा केंद्र सरकारने अश्या पद्धतीने इतक्या टोकाची आकसबुद्धी वापरली नव्हती मी म्हणतो ही अशी इतकी खालची पातळी एका वेगळ्या पद्धतीच्या शिकवनुकीतूनच येते याची जाण देशातल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना चांगलीच आहे तरीही कोणाला काहीही पडलेली नाहीये.

शेतकरी विरोधी कायदा असेल किंवा CAA NRC असेल तेंव्हाही भाजपकडे राज्यसभेत बहुमत नव्हतंच मग हे सगळं पाप नक्की कोणाचं हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही, देशाच्या नागरिकत्व कायद्याच्या मतदानाच्या वेळी कोण कोण गैरहजर होत हे सुद्धा देशाला चांगलंच माहितीये...  आज देशातील सामाजिक सलोखा समतेच्या अंगाने विषमतेविरोधात वृद्धिंगत होत असतानाच राजकीय दृष्ट्या कोण कोण कच खातय आणि का कच खातय हे सुद्धा लपून राहिलेलं नाहीये....  आतातरी सुधरा वेळ अजून गेलेली नाहीये...  आम्हाला माहीत आहे की, देशातील सामाजिक आणि आर्थिक समतेची चळवळ एका बाजूने मोठी होत असताना त्याला हवी असलेली राजकीय बाजू आज कधी नव्हे इतकी कमजोर आणि नपुंसक होत आहे.  मोदी आणि भाजप सरकारने पास केलेले देशविरोधी कायदे आम्ही सत्तेत आल्यावर बदलू अस साधं वाक्य सुद्धा खांग्रेस आणि इतर UPA वाले आजवर संसदेत नाही तर किमान एखाद्या कोणत्या भाषणात तरी बोललेले ऐकिवात आहे का ????

महाराष्ट्रात सत्तेसाठी सुरू झालेला हा वाद आज पुन्हा एकदा समता विरुद्ध विषमता आणि समरसता असाच थेट आहे हे नीट समजून घ्या....महाविकास आघाडीने जर भीमा कोरेगाव हल्ल्याचा तपास योग्य दिशेने NIA कडे न जाता स्वतः केला असता तर आज हाच फडणवीस जो खूप जास्त फडफडतोय त्याचे पंख छाटता आले असते पण यात पवार आडवे आले की ठाकरे की मराठा लॉबी की CKP इगो की ह्या सगळ्यात ठासून भरलेला जातीवाद ????

शेवटचं,
आज देशाचा अन्नदाता करोडोच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर सव्वाशे दिवसांपासून लढतोय, अंबानीच्या JIO च्या टॉवरच शेतकऱ्यांनी काय केलं हे वेगळं सांगायला नकोच... तिथे ही इतकीशी मुंबईतली घटना याच स्वरूप किती आणि याला व्याप्ती देतंय कोण ???  कोणते अधिकारी आहेत जे भाजपचे जातभाई आणि मांडलिक भाट आहेत ???  अनिल देशमुख यांच्या शिवाय गृहखात्याची माहिती बाहेर जातेस कशी ???  आणि नेमकं अंबानी वाझे आणि मनसुख हिराणी प्रकरनातून नेमकं काय असा मोठा खजिना उघड होणार आहे ???  की या प्रकरणाच्या आडून देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांच काही वेगळंच महास्फोटक तयार होतंय ???  देशाच्या नागरिकांनी या सगळ्यांच्या मुळाशी जावं आणि देशाचा अन्नदाता शेतकरी असेल, किंवा नागरिकत्वाचा मुद्द्याला घेऊन भयभीत झालेला मुस्लिम समाज असेल किंवा आता बँकेच्या, सरकारी कंपन्या आणि मालमत्तेच्या आडून खाजगीकरनाच्या नावाखाली कायमच बेरोजगार झालेला कर्मचारी असेल या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहण्याची आज वेळ आलेली आहे.  हे सगळं करत असतानाच, Rss आणि भाजप वेगवेगळे मुद्दे उपस्थित तुम्हाला मुख्य विषयापासून आणि प्रश्नांपासून भरकटवण्याचा प्रयत्न करत राहील आपण सजग आणि देशाच्या संविधानाच्या बाजूने उभं राहाव हे मनःपूर्वक आवाहन करतोय. 

सरतेशेवटी ही लढाई विषमते विरुद्ध समतेची आहे आणि कोणत्याही धर्माविरुद्ध नसली तरी धर्मनिरपेक्षतेची आहे आणि अर्थात ही लढाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आणि कायम केलेल्या we the people of India यासाठी आहे. 

टीप :  १.काळाची सगळ्या प्रकारची पाऊले आंबेडकरवाद्यानाचं कळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्याबद्दल बुद्धापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंतच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.  २. यावेळी आम्हाला काहीही फरक पडणार नाही आमची घरे आजवर खूप होरपळीत आता तुमचे महाल सांभाळा. त्यासाठी डॉ राहत इंदोरी साहेबांची शायरी वाचा नाहीतर आरपारच्या लढाईला सज्ज व्हा विजय आपलाच असेल.

धन्यवाद !!

आपलाच,
महेंद्र अशोक पंडागळे
7678044677
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com