सायकल स्टॅण्डनंतर ठाणे महानगर पालिकेच्या अॅम्ब्यूलन्स बाईकची वाताहत


 सायकल स्टॅण्डचा कारभार आटोपल्यानंतर त्या सायकल कुणाच्या ताब्यात गेल्या. त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी बुडीत खात्यात जमा झाल्यानंतर आता मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेल्या  अॅम्ब्यूलन्स बाईकची वाताहतही समोर आली आहे. ॲम्ब्युलन्स बाईकचा वापर सुरुवातीपासूनच नगण्य आहे. या ॲम्ब्युलन्स बाईक दादोजी कोंडदेव स्टेडियमध्ये कित्येक वर्षे धूळ खात पडून होत्या. त्यानंतर कोरोना काळात त्यांचा वापर करण्याचे ठाणे महानगर पालिकेने ठरवले. मात्र तीथेही त्यांचा वापर नगण्यच असल्याने त्या आजही पडून असल्याने त्यावर खर्च झालेला निधी देखील बुडीत खात्यात जमा झालेला आहे. अशा तऱ्हेने ठाणेकरांच्या मानगुटीवर बसून टॅक्स वसूल करणारी ठाणे महानगर पालिका या टॅक्सच्या पैशाचा अशा तऱ्हेने बुडीत उपयोग करीत असल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिला आहे की, ॲम्ब्युलन्स बाईकचा उपयोग न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.  ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनखाली आणि उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १४ चे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी महापालिकेचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणला. आयुक्तांच्या आदेशाने दाटलोकवस्ती, डोंगराळभाग अशा ठिकाणी जिथे रुग्णसेवेसाठी आपत्कालीन व्यवस्था लवकर पोहचू शकत नाही,अशा प्रभागांसाठी ठाणे महानगर पालिकेने ४५ लाख रुपये खर्च करुन ३० ऍम्ब्युलन्स बाईकची खरेदी केली होती. या योजनेनुसार काही ऍम्ब्युलन्स बाईक या स्थानिक आरोग्य केंद्रांना आपत्कालीनस्थितीतील रुग्णसेवेसाठी देण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनाकाळात ज्या वयोवृद्ध नागरिकांना कोरोना चाचणीकरण्यासाठी आरोग्य केंद्रावर येता येत नाही,अशा रुग्णांसाठी या बाईक ऍम्ब्युलन्सचा वापर करावा असे आयुक्तांनी आदेश दिले होते. 

परंतु या बाईक ऍम्ब्युलन्सचा म्हणावा तसा उपयोग आरोग्य केंद्राकडून झाला नाही.सद्यस्थितीत या बाईक ऍम्ब्युलन्स कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहेत,याबाबत मनसे शोध घेणार असे पत्र सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार ह्या १६ नवीन अंबुलन्स बाईक महिला बचत गट भवन लोकमान्य नगर येथे अडगळीत पडलेल्या आढळल्या. ह्या बाईक जर वापरात आणल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य वैद्यकीय अधिका-यांच्या कक्षात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA