Top Post Ad

मजूर आंदोलनापासून झाली महिला दिनाची सुरूवात


. वर्ष 1908 ला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील महिला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या रुपाने साजरे केले जाते. आपल्या नोकरीचे तास कमी करण्याच्या मागणी व्यतिरिक्त चांगले वेतन आणि मतदानाच्या अधिकारासाठी महिलांनी आवाज उठवला. त्यानंतर एक वर्षांनी अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन घोषित करण्यात आला.

वर्ष 1910 मध्ये कोपेनहेगन येथे महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदे दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावेळी या परिषदेमध्ये 17 देशांपैकी 100 महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांनी याला पाठिंबा दिला. त्यानंतर वर्ष 2011 मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्विर्झलँडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

1975 मध्ये संयुक्त राष्ट्राने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. 

1917 मध्ये युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड अँड पीसची मागणी केली. महिलांच्या या आंदोलनामुळे तेथील सम्राटाला पद सोडावे लागले. सोबतच सरकारने महिलांना मतदानाचा हक्क देखील दिला. त्यावेळी ज्युलियन कँलेडरचा उपयोग होत असे. ज्या दिवशी हा संप सुरू झाला तो दिवस 23 फेब्रुवारी होता. तर ग्रेग्रोरियन कॅलेंडरमध्ये तो दिवस 8 मार्च होता. तेव्हापासूनच या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित करण्यात आले.

हा महिला दिन जागतिक पातळीवर साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम क्लारा जेटकिन्स यांनी १९१० साली कोपनहेगन येथे व्यावसायिक महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये प्रथम मांडली. या परिसंवादासाठी एकूण सतरा देशांमधील शंभर महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांनी जागतिक महिला दिनाच्या कल्पनेला समर्थन दिल्यानंतर १९११ सालामध्ये डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये जागतिक महिला दिन सर्वप्रथम साजरा करण्यात आला. १९७५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला औपचारिकरित्या मान्यता दिल्यानंतर ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर’ अशी जागतिक महिला दिनानिमित्त पहिली थीम होती. तर या वर्षी थीम ‘I am Generation Equality: Realizing Women’s Rights’, अशी आहे.

क्लारा जेटकिन्सने जेव्हा जागतिक महिला दिनाची कल्पना मांडली, तेव्हा हा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जावा हे निश्चित केलेले नव्हते. ज्या दिवशी महिलांनी मतदानाचा हक्क मागितला आणि त्यासाठी आंदोलन केले तो दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे आठ मार्चचा होता, म्हणून त्या तारखेची निवड जागतिक महिला दिन म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही साजरा केला जात असून १९ नोव्हेंबररोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. १९९० सालापासून हा दिवस साठहूनही अधिक देशांमध्ये साजरा केला जात असला, तरी अद्याप या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यता मिळालेली नाही.

प्राचीन काळापासून ते आजपर्यंत भारतासह जगभरात महिला आपल्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी लढत आलेल्या आहेत. आज या लढाईत महिलांना काही प्रमाणात यश आले आहे, मात्र आजही समानतेसाठी त्यांची लढाई सुरूच आहे. आपल्या हक्कासाठी ज्यावेळी महिला रस्त्यावर उतरल्या, तेव्हापासूनच या दिवसाची सुरूवात झाली. विविध देशात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते, तर काही ठिकाणी महिलांना फुल दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com