गुजरातमध्ये गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये, महाराष्ट्रातले कोर्ट फिरतायत


गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये परमवीर सिंह कोर्ट फिरतायत… आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..!!  काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केलेल्या ट्विटवरून राजकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे.  मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवरच लेटरबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामध्ये सिंह यांनी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर लगेचच त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आपल्या बदलीच्या निर्णयाला आवाहन दिलं आहे. सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्विटरवरुन अप्रत्यक्षपणे भाजपा आणि भाजपा समर्थकांवर निशाणा साधाला आहे. गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी असणाऱ्या संजीव भट्टला २०१९ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताब्यात असणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सध्या तुरुंगामध्ये आहे. 

२३ मार्च रोजी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजीव भट्टचा उल्लेख केला होता. “राज्यसभा, लोकसभेत गोंधळ घालत सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावर इतका विश्वास ठेवून राजीनामा मागितला जात असेल तर मला विचारायचं आहे की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, प्रदीप शर्मा यांनी वारंवार अशी पत्रं लिहिली आहे. तर मग त्या पत्राच्या आधारे गुजरात सरकारचे माजी मुख्यमंत्री किंवा सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार आहात का? संजीव भट्ट यांनी केलेले आरोप परमबीर सिंह यांच्यापेक्षाही गंभीर होते. तुम्ही संजीव भट्टला जेलमध्ये टाकलं. तर मग महाराष्ट्रात वेगळा न्याय आणि गुजरातमध्ये वेगळा न्याय का? ही कोणती राज्यघटना आहे?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. “संजीव भट यांचं पत्र पुन्हा समोर आणावं असं माझं कायदामंत्र्यांना आवाहन आहे. आणि जे लोक लोकसभा आणि राज्यसभेत नाचत होते त्यांनी संजीव भट यांचं पत्र समोर आणावं आणि त्यावरही कारवाईची मागणी करावी,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरले. विरोधकांकडून वाझे प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गृह विभागाने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्त पदाची सूत्रं देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप सिंह यांनी याचिकेत केलेला आहे. सिंह यांनी याचिकेत तीन मागण्या केलेल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत केलेल्या आहेत. त्यामुळे याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, दुसरीकडे राज्यामध्ये या सुनावणीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या रिपोर्टवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये परमवीर सिंह कोर्ट फिरतायत… आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..!! — Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) March 23, 2021


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA