Top Post Ad

महाराष्ट्र पोलीसमधील एक घृणास्पद शुक्लकाष्ठ !

बदल्यांचे तथाकथित रॅकेटबद्दल गोपनिय माहिती राजकारणासाठी उपलब्ध करुन देणा-या रश्मी शुक्लांना जे ओळखतात किंवा ज्यांनी त्यांचेसोबत काम केले आहे ते शुक्लांचे नाव काढले की नाक मुरडतात, कपाळावर आठ्या येतात आणि त्यांच्या चेह-यावर शुक्लांबाबत तिरस्काराचे भाव येतात.असे हे कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व !
शुक्लांची पोलीस दलात ‘काड्या करणारी बाई’ अशी ओळख! शुक्लांच्या संपूर्ण कारकिर्दीत फार कमी वेळा त्या कार्यकारी पदावर राहिल्या त्यामुळे त्या कामकाजात अजिबात कार्यक्षम नाहीत परंतु त्यांचे nuicense चे आणि चाटूगिरीचे कौशल्य मोठे असल्यांने राजकिय मंडळींच्या जवळ जाऊन इतरांना त्रासदायक भूमिका बजावण्यात,काड्या करण्यात मात्र त्यांचा कुणीही हात धरु शकणार नाही त्यामुळे या बाईबद्दल पोलीस दलात कधीच आदर नव्हता.IPS मधील जी काही नावे बदनाम म्हणून घेतली जातात त्यात हे नाव अग्रेसर आहे.
पोलीस दलात वरिष्ठ अधिका-यांत गटबाजी असल्याचे सतत बोलले जाते.महासंचालक कार्यालयात नेमणुकीस असतांना शुक्ला यांनी अशा गटबाजीचा उत्तम नमुनाच घालून दिला. एका अजिबात ‘दयाळू’
नसलेल्या निर्दय वरिष्ठाचे कान भरुन भरुन अख्ख्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना त्रास देऊन हैराण करुन सोडले होते.त्यातच SID ला दोनदा नेमणूक झाल्यानंतर दररोज कुणाचा नाही कुणाचा फोन टॅप करण्याची वाईट सवयच तिला लागली.त्या जोरावर अनेकांना तिने ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे.

पुण्यात पोलीस आयुक्त असतानाचे शुक्लांचे अनेक सुरस किस्से सांगण्यात येतात.
पुण्यात एका अट्टल व कसूरदार पोलीस निरीक्षकास पेडगांवला जाऊन पाठीशी घातले. काही पत्रकारांनी खोलात जाऊन माहिती काढली तर जुन्या काळात विदर्भात IPS प्रोबेशनला असतांना शुक्ला म्हणे या पोलीस निरीक्षकाच्या मारुती ८०० कारचा वापर एका व्यक्तीबरोबर अनैतिक कामासाठी करीत असत. त्यांने तोंड उघडू नये म्हणून त्याला पाठीशी घातले जात होते.
पुण्यात आपल्याच एका IPS सहका-यास अडचणीत आणण्यासाठी तिने जंग जंग पछाडले होते. हुशार परंतु तिरसट असणा-या या सहकारी वरिष्ठ अधिका-याच्या वापर करुन,अनेक केसेसमध्ये कायदेशीर बाबींचा आधार घेऊन आपले नाव व प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला. या अधिका-यांने अनेक गुंडांना मोका लावून पोलीसांचा ‘जॅाईंट’ दबदबा निर्माण केला होता. शुक्लांनी या पोलीस अधिका-याच्या कायद्यातील हुशारीचा ‘जॅाईंट’ उपयोग करुन घेतला परंतु गरज संपताच त्याच्याच मागे शुक्ला लागल्या.एका आर्थिक प्रकरणात एका पोलीस निरीक्षकांने हे वरिष्ठ अधिकारी बेकायदेशीर आदेश देत होते असे शुक्लांच्या सांगण्यावरून रेकॅार्डवर घेतले.या प्रकरणात या हुशार अधिका-यांने या पोलीस निरीक्षकासह शुक्लावर जातीवाचक कायद्यानुसार तक्रार केली, त्याची चौकशी अजून चालूच असल्याचे समजते.मग त्याला थेट त्याचा संबंध नसलेल्या खुनासारख्या गुन्ह्यांत अडकविण्याचा प्रयत्न केला.तोही प्रयत्न फसला.यांत एका उपायुक्ताने असल्या डावपेचात सहभागी होण्यास शुक्लांना नकार दिल्याने हाही प्रयत्न फसला मात्र तो उपायुक्त नजरेत बसला.
एका व्यावसायिकाकडून तिने आपल्या मर्जीतल्या पोलीस निरीक्षक धुमाळ मार्फत एका अर्ज चौकशी प्रकरणात 25 लाखांची मागणी करण्याचे प्रकरण खूप गाजले.त्यासंदर्भाने त्यांनी त्याच्या उपायुक्ताला ‘तुमचे लक्ष नाही’ असा मेमो दिला कागदपत्रात हुशार असणाऱ्या त्या उपायुक्ताने उलट उत्तर सादर केले की ‘तुम्ही ते प्रकरण आमचे मार्फतीने न पाठवतां थेट एका पोलीस निरीक्षकाला परस्पर मार्क करता, यांत तुमचाच Interest असल्याने आम्ही लक्ष देणे शक्य नाही’.यांवर बाईंचा खूप जळफळाट झाला. त्यानंतर आधीच नजरेत बसलेल्या त्या उपायुक्ताला अन्य प्रकरणात हर प्रकारे अडकविण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापुरी पैलवान असलेला उपायुक्त या डावपेचांना पुरुन उरला म्हणून त्याचे काम उत्कृष्ट असतानाही काम चांगले नाही असा शासनास अहवाल पाठवून त्याची बदली नागपूरला केली.वास्तविक त्या धाडसी अधिकाऱ्यांने गुन्हे उघडकीस आणण्याचा धडाका लावून गुन्हे शाखा पर्यायाने पुणे पोलीसांचे व शुक्लांचे नाव उंचावले परंतु ‘उसका नाम रोज कैसे मिडीया में आता है?’ असे म्हणून रोष व्यक्त केला. शुक्लांचे पती कमी वयातच कॅन्सरने निर्वतले तेव्हा या उपायुक्तांने नागपूरवरुन सांत्वनासाठी पुण्यात येऊन ‘मॅडम अब तो सुधरो’ असे म्हटल्याचे बोलले जाते.पुढे त्या उपायुक्तावर नागपूरला विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यातही त्यांचा वरिष्ठांचे कान भरण्यापासून ते SID चे संबंध वापरण्यापर्यंत हात होता परंतु त्या गुन्ह्यातही ‘बी’ फायनल झाल्याने तपासात तो अधिकारी निर्दोष सिद्ध झाला.
शुक्लांचे आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते.त्यांना त्यांच्याच पोलीस विभागातील महिला अधिकाऱ्यांचे फार वावडे. कुणी महिला अधिकारी जर दिसायला नीटनेटकी असेल तर मग बोलायलाच नको.तिला त्रास द्यायला शुक्लांना असुरी आनंद मिळायचा. पिंपरी चिंचवड विभागाच्या एका महिला ACP ला असाच त्रास देऊन तिची पुण्याबाहेर बदली केली परंतु ती ACP पण भारी. तिने थेट MAT कोर्टात शुक्लांना खेचले.एका मपोसे महिला उपायुक्तालाही असाच त्रास दिला आणि शासनास खोटा अहवाल पाठवून पुण्याबाहेर बदली केली. त्या महिला उपायुक्तानेही शुक्लांना MAT कोर्टात खेचले.वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे MAT नेही शुक्लांच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त केली. उंचापुऱ्या असणाऱ्या एका लेडी सिंघम महिला IPS लाही असाच त्रास दिल्यांने दोघींत दररोज चांगलाच कलगीतुरा रंगायचा.
SID ला असतांना शुक्लांनी एक्साईज विभागाच्या औरंगाबाद च्या एका वरिष्ठ महिलेसही तिचे फोन टेपिंग करुन किरकोळ कारणांवरुन तिला निलंबित करायला लावले. SID तील एका API ला त्रास देऊन रायगड ला बदली केली. त्यांने रायगड येथे आत्महत्या केली.शुक्लांच्या छळामुळेच त्यांने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. परंतु हेही प्रकरण दाबले गेले.
फोन टॅपिंग चे व्यसनच असलेल्या शुक्लांनी महाविकास आघाडीचे सरकार बनत असतांना अनेक आमदारांना ‘ तुम्हारी फाईल मेरे पास है’ असे म्हणून धमकावून त्यांना भाजप कडे वळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चर्चा होऊ लागताच. वरिष्ठ नेते व मंत्र्यांच्या अक्षरश: पाय धरुन माफी मागितली. ‘अपनी बहन समझके माफ करो’ अशी विनवणी केल्यांने त्यावेळी माफ करण्याचा मोठेपणा दाखवला तोच आता त्यांच्या अंगलट आला. शुक्ला एक महाधूर्त नव्हे महालबाड अधिकारी असतांनाही तिला ओळखतां आले नाही.वेळ येताच या गद्दार बाईने आपले खरे रुप दाखवले.ज्यांनी तिच्या विनंतीस मान दिला त्यांनाच दगा दिला, दंश केला.फोन टॅपिंगचे तथाकथित प्रकरण व गुप्त कागदपत्रे प्रशासकिय शिस्तीचे भान न ठेवतां विरोधकांच्या हाती सोपवून IPS केडरवर आपण कलंक असल्याचे सिद्ध केले. तिच्यावर कारवाई वैगेरे होत राहील पण परराज्यातून नोकरीसाठी महाराष्ट्रात येऊन रश्मी शुक्लाने महाराष्ट्रालाच बदनाम करण्याचे काम केल्यांने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो’ असे वक्तव्य केल्याने परराज्यातून महाराष्ट्र केडरमध्ये आलेल्या व येणाऱ्या प्रत्येक IPS अधिकाऱ्याकडे संशयाने बघितले जाईल हे नक्की! भाजप ची एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लांच्या रुपाने IPS केडरला लागलेला कलंक लवकर पुसला जाणार नाही हेही तितकेच खरे!!
@रमेश वानखेडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com