Top Post Ad

शासनाने केलेल्या कायद्यांचा लाभ असंघटित क्षेत्राला मिळणे आवश्यक - कामगारमंत्री


मुंबई :

केंद्र शासनामार्फत असंघटित क्षेत्राची वर्गवारी जवळपास २११ तर राज्य शासनाने असंघटित क्षेत्राची वर्गवारी जवळपास ३०० इतकी निश्चित केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात असंघटित क्षेत्रातील प्रमुख ८ ते १० वर्गवारी निवडून या वर्गासाठीचे काम सुरु करण्यात येईल. असंघटित क्षेत्रात काम करीत असणाऱ्या कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल, असे प्रतिपादन कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.  दि.४ मार्च रोजी  आपत्कालीन परिस्थितीमध्ये मजूरांच्या स्थलांतराबाबत आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. 

पाटील पुढे म्हणाले, राज्यात जवळपास २८ लाख ५५ हजार संघटित कामगार आहेत तर असंघटित कामगारांची संख्या ३ कोटी ६५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनामार्फत बनविण्यात आलेल्या कायद्यांचा फायदा असंघटित क्षेत्राला मिळणेही आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत असंघटित कामगारांसाठी आरोग्य, शिक्षण आणि निवारा या तीन बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून कामगार विभाग सुध्दा याच बाबींवर लक्ष देत आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुसरुन उपस्थित असलेल्यांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात उपसभापती यांच्याकडे किंवा कामगार विभागाकडे द्याव्यात जेणेकरुन या सगळ्या सूचनांचा विभागामार्फत अभ्यास करण्यात येईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद- सिंघल यांनी यावेळी स्थलांतरित कामगारांसाठी शिक्षण, आरोग्याची काळजी, दोन वेळेच्या जेवणाबाबतची सोय आणि या कामगारांना कायमस्वरुपी निवारा उपलब्ध करुन देण्याबाबत उपाययोजना कशा करता येतील याबाबत अभ्यास करीत असल्याचेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

 असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने प्राधान्य देऊन असंघटित कामगारांची नोंदणीला प्राधान्य देण्यात यावे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया जलद गतीने सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली. त्या पुढे म्हणाल्या, राज्यात असंघटित कामगार मोठ्या संख्येने असून त्यांच्या  समस्यांचे निराकरण करणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे असंघटित कामगार कल्याण बोर्ड पुन:श्च पूर्ण क्षमतेने पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. असंघटित कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक असून त्यादृष्टीने योजना तयार करणे आवश्यक आहे. राज्यातील असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार विभागाने कृती आराखडा तयार करुन येत्या वर्षभरात या कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 

कामगार आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी यावेळी राज्य शासनामार्फत कामगारांसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरु करणे, कामगार कल्याण मंडळामार्फत वेबपोर्टल तयार करणे, लॉकडाऊन कालावधीत कामगारांना देण्यात आलेले मध्यान्ह भोजन आणि कामगारांमधले कौशल्य वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम याविषयीची माहिती या बैठकी दरम्यान दिली.

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, विकास आयुक्त (असंघटित कामगार)पंकज कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार विभागाचे सहसचिव शशांक साठे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, नीरजा भटनागर, प्रतिभा शिंदे, सुनीती सूर, रमेश भिसे, अश्विनी कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी यांच्यासह पत्रकार संजय जोग, पत्रकार दिप्ती राऊत, आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  बैठकीत स्थलांतरित कामगारांबाबतचा कृती आराखडा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मजूरांच्या स्थलांतराबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. 

-------------------

बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना नाशिक जिल्हातील बांधकाम (मजुर) कामगारांना शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे जाहिर आव्हान करण्यात आले आहे. नोंदणीसाठी  १) पासपोर्ट आकारातील फोटो   २) आधारकार्ड झेरॉक्स  ३) रेशनकार्ड झेरॉक्स  ४) बँक पासबुक झेरॉक्स आवश्यक असून सदर सर्व योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत राबवले जातात. बांधकाम कामगारांनो लवकर नोंदणी करुन घ्या आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बहुजन असंघटीत मजदूर युनियनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष  विशाल भदर्गे यांनी केले आहे. 

१) कामगारांच्या कुटूंबीयांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी र. १,००,००० (एकलाख) अर्थससाह्य. नाशिक जिल्हाध्यक्ष
२) कामगाराला काम करातांना अपंगत्व आल्यास रु. २,००,००० (दोन लाख) अर्थसाह्य.
३) कामगाराचा कामावर असतांना मृत्यु झाल्यास त्याच्या पत्नी/पती यांना र. २४,००० ( चोबीस हजार) प्रतीवर्षे अर्थसाह्य ( तीन वर्ष).
४) कामगाराचा कामावर मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास रु. ५,००,००० (पाच लाख) अर्थसाह्य.
५) कामगाराला स्वतःच्या घर बांधणीसाठी र. ४.,५०,००,०० (चार लाख पन्नास हजार) अर्थसाह्य.
६) कामगारास स्वत:साठी लागणारे साहित्य घरेदीसाठी रु. ५०००/- तीन वर्षातुन एकदा.
७) कामगारास पहिल्या मुलीच्या विवाहाच्या खर्चासाठी रु. ३०,०००/- अर्थसाह्य.
८) कामगाराच्या पत्नीस २ आपत्यापर्यंत
    १) नैसर्गिक प्रसुतीसाठी रु.१५,०००/- २) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी रु.२०,०००//-.
९) कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी 
१) इ. ली ते इ. ७ वी. :- रु.२५०० प्रतीवर्षी 
२) इ.८ वी. ते इ. १० वी.:- रु. ५,००० प्रतीवर्षी
३) इ. १९वीते इ. १२ वी:- र.१०,०००/- प्रतीवर्धी 
४) पदविका अभ्यासक्रम साठी :- र.२०,००० प्रतीवर्षी.
५) पदवीसाठी :- रु. २०.०० प्रतीवर्षी 
६) अभियांत्रिकी पदबीसाठी :- र.६०,००० प्रतीवर्षी.
७) वेद्यकीय पदवीसाठी:- र. १,००,००० प्रतीवर्षी .
८) एम.एस सी.आय.टी चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परिपुर्ती व इतर .
१०) एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रीक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,००० मुदत बंद ठेव.
११) बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी ६,००० अर्थसाह्य.
१२) बांधकाम कामगारा मृत्यु झाल्यास अंतविधीसाठी १०,००० अर्थसाह्य,
१३) नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतीराव फुले व जन आरोन्य योजना लागू आहे.

अधिक माहितीकरिता

बहुजन अर्सघटित मजदुर युनियन शहर कार्यालय पत्ता:- प्लॉट नं.३१, महिंद्रा अण्ड महिंद्रा कंपनी शेजारी, सातपुर एम.आय.डी.सी. सातपुर, नाशिक.

सातपुर बिभाग :- भागवत गायकवाड ८ ३२९६९९४७४२

नाशिकरोड विभाग:- मुनाफ शेख ८४११८४२२११ * नाशिकरोड विभाग:- श्रीमती सारिका नागरे ९१७५१९३९०१

सिडको विभाग :- रेणुका शेजवळ ९८३४४१४३८२ * सिडको विभाग:- तुळशीदास जाधव ९७६३४३८५८२

आडगाव बिभाग:- शिल्पा जाधव ८७६७००१९९० * इगतपुरी तालुका :- सोमनाथ भोंडवे ९५७९७३६२९४

देवळा तालुका :- विलास माळी ९९२३५०३६२१ * सटाणा तालुका:- डॉ. सिद्धार्थ जगताप ७५८८६१८६६९

कळवण तालुका:- भगवान खिल्लारी ९४२१५२४८२०* निफाड तालुका:- संतोष कडभाने ८८८८३१७६९१

सुरगाणा तालुका:- विजय जाधव ७८८७३२८५५५ *: मालेगाव तालुका:- सोनु हेळंगे ९३०७१६३८९४
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com