Top Post Ad

उद्योगधंदे बंद ; १० हजाराहून अधिक कंपन्यांना टाळे


 वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या असं कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी स्पष्ट केलं. लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना  त्यांनी ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते.  मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद झाल्या नाहीत, असे सांगितले. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आकडेवारीसंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ३९४ कंपन्या बंद पडल्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू (१३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा अव्वल पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे. चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येक ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या बंद पडल्या आहेत. याचप्रमाणे झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १०४ कंपन्यांना एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये टाळं लागलं. इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांबद्दल बोलायचं झाल्यास मेघालयमध्ये ८८, ओदिशामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्चिम बंगालमध्ये चार तर अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्यात. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०२० च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळेच कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करुन मे महिन्यापासून हळूहळू काम करण्यास सुरुवात करावी लागली. अचानक केलेल्या या अघोरी लॉकडाउनमुळे कंपन्यांना मोठं नुकसान झालं आणि त्यामुळेच हजारो कंपन्यांनी आपला कारभार बंद केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com