प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्याविरोधात बांग्लादेशातील अनेक भागात निषेध नोंदविला जात होता. अनेक भागात आंदोलनकर्ते हिंसक झाल्याचे पाहायला मिळाले. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. भारतात मुस्लिमांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप बांग्लादेशातील कट्टरपंथीयांकडून केला जात असल्याचा आरोप करीत मोदी यांचा बांग्लादेश दौरा संपताच तेथे कट्टरपंथीय इस्लामिक गटांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला. यासोबतच रविवारी देशाच्या पूर्वेकडील भागातील एका ट्रेनवरही निशाणा साधला. स्थानिक पत्रकार आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली. आतापर्यंत कमीत कमी 10 आंदोलनकर्त्यांचा पोलिसांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा निषेध कट्टरपंथी इस्लामिक समुहाकडून केला जात आहे. मोदींनी शुक्रवारी बांग्लादेशाच्या 50 व्या स्वातंत्र दिनानिमित्त राजधानी ढाका येथे भेट दिली. दोन दिवसांचा दौऱा पूर्ण केल्यानंतर शनिवारी ते भारतात परतले.
शुक्रवारी ढाकामध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी टीयर गॅर आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. ज्यामुळे अनेक लोक जखमी झाले. हजारो इस्लामवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी चटगांव आणि ढाकाच्या रस्त्यांवर रॅली काढली. रविवारी हिफाजत-ए-इस्लाम समुहाच्या कार्याकर्त्यांनी ब्राम्हणबरियामध्ये एका ट्रेनवर हल्ला केला. ज्यामुळे 10 लोक जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीखाली सांगितलं की, हल्लेखोरांनी ट्रेनवर हल्ला केला आणि इंजिन रुमबरोबर सर्वत्र मोठं नुकसान केलं.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार ब्राम्हणबरियाचे पत्रकार जावेद रहीम यांच्या हवाल्याने सांगितलं की, ब्राम्हणबरियात अग्नितांडव सुरू आहे. अनेक सरकारी कार्यालयात आग लावण्यात आली आहे. इतकच नाही तर प्रेस क्लबवरदेखील हल्ला झाला आणि यात अनेक लोक जखमी झाले. ज्यात प्रेस क्लबच्या अध्यक्षांचादेखील समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की शहरातील अनेक हिंदू मंदिरांवरही हल्ला करण्यात आला. या जमावाने राजशाही शहरातील दोन बसेसना आग लावली. याशिवाय शेकडो आंदोलनकर्त्यांची नारायणगंजमध्ये पोलिसांसोबत हातापायी झाली. यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
0 टिप्पण्या