Top Post Ad

बहुजन असंघठित मजदुर युनियनचा वर्धापन दिंन संपन्न

 बहुजन असंघठित मजदुर युनियनचा  वर्धापन दिंन नाशिक येथील सौभाग्य लॉन येथे  नुकताच साजरा करण्यात आला.  नाशिक जिल्हा अध्यक्ष व युवा कामगार नेते विशाल भदर्गे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा कायर्क्रम संपन्न झाला. कोविडची भयंकर परिस्थिती असताना देखील शेकडो कामगार बंधू व भगिनी उपस्थित होते  युनियनचे सरचिटणीस/संस्थापक प्रा चंद्रभान आझाद अध्यक्षस्थानी होते, बामसेफचे नेते अशोक डोंगरे, खादी ग्रामोद्योग चे माजी डायरेक्टर कांबळे,बहुजन संघटक चे नेते सर्वाजित बनसोडे, महिंद्रा युनियन चे नेते, पत्रकार नरेंद्र नाशिककर, खजिनदार प्रभाकर जाधव Adv सतीश औसरमोल , धरमनाथ विश्वकर्मा , बी डी खडसे आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते , 

संमेलनात तीन ठराव पारित करण्यात आले 1) देशातील नोकऱ्यांमध्ये असलेली ठेकेदारी पद्धती रद्द करावी व केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले 4 कामगार सुधारणेच्या नावा खाली कामगारांना उध्वस्त करणारे कायदे त्वरित मागे घ्यावेत २) देशातील 3 शेतकरी कायदे त्वरित मागे घेवून शेतकरी बांधवांना MSP ची हमी द्यावी सोबतच शेतमजुरांना किमान वेतननिश्चिती करून समान काम समान वेतन देण्यात यावेत 3)युनियन चे सदस्यांना पुढील आर्थिक वर्षात किमान 1000 जणांना रोजगार मिळवून देत उद्योजक बनविण्याचा संकल्प युनियन चे खजिनदार प्रभाकर जाधव यांनी जाहीर केल्या बरोबर सर्वांनी उभे राहून ठरावाचे समर्थन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com