जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी न लागल्यास कारवाई होणार

 

ठाणे
 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे हे विविध
  कल्याणकारी योजनांचा प्रत्येक तालुका निहाय सखोल आढावा घेत आहेत. आज त्यांनी मुरबाड तालुक्याचा आढावा घेतानाच रखडलेल्या योजना मार्च अखेर  मार्गी न लागल्यास संबधितांवर कडक  कारवाई  केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत बैठकीत दिले.

 

महा आवास अभियान काळात पूर्ण करत असलेली घरकुल कामंजल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीच्या कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. ही दोन्ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण  करण्याचे निर्देशही दिले. त्याच बरोबर ग्रामपंचायतआरोग्यग्रामीण पाणी पुरवठापाणी पुरवठा यांत्रिकीमहिला व बाल कल्याण शिक्षण विभागआदी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवारअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेप्रकल्प संचालक छायादेवी शिसोदेउप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवारकार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मेकार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघेमहिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसलेमुरबाड गट विकास अधिकारी रमेश अवचार आदी अधिकारी तसेच ग्रामसेवक,  जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

 

या बैठकी नंतर तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देण्यात आल्या.यामध्ये शिवळेमोहोप ग्रामपंचायतीची पाहणी केली. महा आवास अभियान अंतर्गत  ग्राम पंचायत नांदगाव येथील प्रधानमंत्री आवस योजनातून बांधलेल्या घराची पाहणी केली. लाभार्थी यांनी गृहप्रवेश करताना श्री.दांगडे यांनी  घराची चावी देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच घरकुल लाभार्थी जनार्दन गणू  आलम यांनी तयार केलीली उत्कृष्ट परसबागेची पाहणी केली. त्याचबरोबर अंगणवाडीप्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशीशाळाआणि बांधकाम विभागाच्या कामांची पाहणी केली.दरम्यान आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते घरकुल योजना उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. हे उपक्रम कोकण विभागात  प्रथमच राबविले जात असल्याचे दांगडे यांनी सांगितले.  यावेळी मुरबाड पंचायत समिती सभापती  श्रीकांत धुमाळउप सभापती खाकर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुतेजिल्हा परिषद सदस्य सर्वश्री सुभाष घरतउल्हास बांगररेखा कंठे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदेउप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवारकार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मेकार्यकारी अभियंता ( बांधकाम) नितीन पालवेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघेमहिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसलेमुरबाड गट विकास अधिकारी रमेश अवचार आदी अधिकारी तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात  विविध घरकुल योजनेतर्गत पक्क्या घरांचे बांधकाम सुरू आहे. लाभार्थ्यांनी ही घरं बांधताना त्यांनी त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थितीपारंपरिक बांधकाम पद्धती अनुसरून घरं बांधावीत यासाठी मुरबाड पंचायत समिती आवारात 'डेमो हाऊसबांधण्यात येणार आहे.  तसेच घरकुलांसाठी  लागणारी साधन सामग्री एकाच छताखाली मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सरळगाव येथे महिला उद्योजक समूह स्थापन करून 'शाश्वत घरकूल मार्टउभारले आहे.  या दोन उपक्रमामुळे नागरिकांना घरबांधतांना आणि साधन सामग्री जमवताना सुलभ होणार आहे. तसेच लाभार्थ्याना राहण्यासाठी सोयीस्कर व  लाभार्थी स्नेही घरकुल बांधकामाला मार्गदर्शन ठरणार आहेत. घरकुल मार्टमुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या समक्ष बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 269 चौ.फूट घरकुल बांधकाम भूकंप प्रतिरोधक आणि पर्यावरण पूरक असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन्ही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दांगडे यांनी सांगितले.

महा आवास अभियाना अंतर्गत सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणा अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य परस्क्रुत आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे यासाठी राज्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. १०० टक्के उदिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रणानी जलद काम करण्याचे निर्देशही दांगडे यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे यांनी घरकुल मार्ट मधून १० हजारच्या सिमेंट गोण्या खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.


मुरबाड गटातील पोटगाव येथील वीटभट्टीवर शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत गरोदर महिलासाठी बाळंतविडास्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष व बालकांसाठी बालकोपरा या वैशिष्ट्य पूर्ण उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिला व बाल विकास विभागआरोग्य विभागग्रामपंचायत यांचे समन्वयातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

बाळंतविडा- आरोग्य तपासणी दरम्यान गरोदर महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचे साधारणतः दिसून येते. तेव्हा गरोदर महिलांना लोहयुक्त आहार मिळावा यासाठी बाळंतविडा वितरण करण्यात आले. बाळंतविडा मध्ये पालकअळुबिटशेवग्याच्या शेंगाशेवगा पाने आणि खजूर असा लोहसमृद्ध आहार महिलांना नियमितपणे ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार आहे.

हिरकणी कक्ष - स्तनदा मातांना बाळास स्तनपान देताना सावली व आरामदायी व्यवस्था असावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

बाल कोपरा - 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना उन्हाचा मातीचा त्रास होऊ नये यासाठी वयोगटानुरूप खेळणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.लोकसहभागातून वीटभट्टी वरील सर्व बालकांना नवीन कपड्यांचा संच देण्यात आला. या ठिकाणी राबविण्यात आलेली बाळंतविडा, हिरकणी कक्ष, बाल कोपरा या अभिनव संकल्पना असून सर्व विटभट्ट्यावर राबविल्या जाव्यात असे निर्देश श्री. दांगडे यांनी दिले.  यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1