Trending

6/recent/ticker-posts

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग महाराष्ट्रात

विदर्भ 
कृषी बील विरोधात देशात अद्यापही आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आता देशव्यापी होणार असल्याची चिन्हे सर्वत्र दिसत आहेत. महाराष्ट्रातही या आंदोलनाचा भडका पेटणार होता. मात्र केंद्र सरकारच्या धोरणांना छुपा पाठिंबा देत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कोरोनाचे कारण देत राज्यात अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला  असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकार केंद्र शेतकरीविरोथी केंद्र सरकारला छुप्या मार्गाने मदत करीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.  

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग  महाराष्ट्रात पोहचली आहे.  20 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांची महासभा होती; परंतु राज्य शासनाने संशयास्पदरित्या ऐनवेळी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे या सभेला परवानगी नाकारली. 20 तारखेची ती सभा यवतमाळ येथे जेव्हा जाहीर झाली आणि 20 तारखेच्या रात्रीनंतर घाईघाईने लॉकडाऊन घोषित करण्यात आला.. त्यामुळे लॉकडाऊनची ही खेळी या सभांना अपशकून करीत करण्याकरिता केल्या जात असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून, यात   राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार  केंद्र सरकारला मदत करीत असल्याचा आरोप आता येथील आंदोलक शेतक्रयांनी केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त दैनिक देशोन्नतीने प्रकाशित केले आहे. 

या मागचा कर्ताकरविता कोण असा प्रश्न आता शेतकऱयांना पडला आहे. नरेंद्र मोदी सरकारविरोधात दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱयांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान,आंध्र प्रदेशआणि तेलंगणा या राज्यांतील शेतकऱयांचा समावेश आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात सुरुवातीला शेतकरी आंदोलने होताना दिसले नाहीत. अशातच महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या शेतकरी आंदोलनांची पार्श्वभूमी असणाऱया प्रकाश पोहरे, श्रीकांत तराळ, अविनाश काकडे यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.  शेतकऱयांमध्ये आंदोलनाची ज्योत पेटवण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिह्यात महासभांचे नियोजन सुरू करण्यात आले होते. मात्र याची चाहूल लागताच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.  

ही सभा आयोजित करणारे श्रीकांत तराळ यांच्यावर सभा रद्द करा म्हणून 19 फेब्रुवारीच्या रात्री यवतमाळचे पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी प्रचंड दबाव आणल्याचे समजते, मात्र ते बधत नाहीत हे पाहिल्यानंतर मग थेट टिकैत यांनाच तुम्ही येऊ नका असे सांगण्यात आले. 19 तारखेला सायंकाळी निघणारे त्यांचे एक विमान लेट करण्यात आले तर दुसरे रहच करण्यात आल्याचे समजते. तरीही टिकैत दुसऱया दिवशी सकाळी निघणार असे समजताच त्यांना आम्ही तुम्हाला विमानतळावर कोरोंटाइन करू किंवा मग दिल्लीत परतताच 15दिवस कोरोंटाइन करू असे सांगितले गेले आणि सभा रद्द करण्याची खेळी यशस्वी करण्यात आली. मात्र ही खेळी खेळणारे नेते की नोकरदार यांचा शोध लवकरच घेतल्या जाईल असा विश्वास शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

आम्ही हजारो शेतकरी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहोत, तेथे कोरोनाचा एकही रुग्ण मिळाला नाही, मग किसान पंचायतींचे आयोजन केलेल्या महेंद्रसिंग टिकैत यांच्या सभास्थळांच्याच जिह्यात कोरोना कसा आला, असा सवाल हरियाना किसान मोर्चाचे तेजविंदरसिंह यांनी विचारत शासनाच्या नीतीवरच संशयाचे बोट ठेवले. आता देश आंदोलनात सहभागी झाला आहे. त्याच वेळेला शेतकऱयांबाबत वारंवार गळा काढणारे अण्णा, बाबा आताच चूप कसे बसले, असाही प्रश्न त्यांनी विचारला. पुढील काळात राज्यात आंदोलनस्थळी लंगर लावण्याची आम्ही हमी घेतो, अशी घोषणा त्यांनी केली. देशातच नव्हे तर विविध देशातही शेतकऱयांचे आंदोलन पसरले आहे. या आंदोलनात कोणत्याही जातीचा म्हणून शेतकरी सहभागी होत नाही तर शेतकरी आंदोलक म्हणून सहभागी होत आहे. स्वातंत्र्यलढ्या प्रमाणेच ही उपलब्धी आहे.   


या लढ्यातून सामाजिक ऐक्य येत्या ५ मार्चपासून शेतकरी नेते राकेश टिकैत राज्याचा दौरा करीत पाच ठिकाणी किसान पंचायतींचे आयोजन करणार आहेत. त्यातील दोन किसान पंचायत विदर्भात होतील. जळगाव, पुणतांबा येथेही किसान पंचायत होणार असल्याची घोषणा वर्ध्याच्या किसान पंचायतीत केली. याची किमान जाणीव केंद्र शासनाने ठेवावी,  अलीकडेच काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे झाले, तेव्हा लोक जमले, त्यावेळी कोरोना नव्हता काय, अशी विचारणाही त्यांच्यासह विविध वक्त्यांनी केली.   मागील ६८ दिवसांपासून हे शेतकरी आंदोलन सुरू आहे. याची माहिती आम्ही सिमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्य लढाईत इंटरनेट सुविधा नव्हती. मग आताच इंटरनेट बंद पाडून आंदोलनात खंड पडणार नाही. गावा गावात पाच जणांची चमू निवडा, त्यांच्याद्वारे आंदोलन नियोजनाचे संदेश पोहोचबा, अशी सूचना तेजविंदरसिंह यांनी केली.

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत शनिवारी यवतमाळ येथील आझाद मैदानावर होणाऱ्या किसान महामेळाव्याला संबोधित करण्याकरिता येणार होते. मात्र, इकडे कोरोना, लॉकडाऊनच्या निमित्ताने तर तिकडे दडपशाहीचे धोरण अवलंबत केंद्र सरकारने त्यांना दिल्लीतच रोखल्याने शेतकरी महामेळाव्याला आलेल्या त्यांच्या सहकारी शेतकरी नेत्यांचे नागपूरवरून यवतमाळकडे जात असताना बुटीबोरी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, टिकेत न येऊ शकल्याने वर्धा मार्गावर अनेकांचा हिरमोड झाला. राकेश टिकैत हे गत दोन तीन महिन्यांपासून केंद्र शासनाने आनलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात संपूर्ण देशात चेतना फुकण्याचे काम करीत आहे. ते यवतमाळ येथे आयोजित किसान महामेळाव्यात शेतकयांना भेटण्याकरिता येणार असल्याने सर्वानाच उत्सुकता होती. हुकुमशाही केंद्र सरकारने त्यांना दिल्ली विमानतळ येथे थांबवून पूर्वनियोजित प्रवास करण्याकरिता रोखले. 

दरम्यान, यवतमाळ येथे शेतकऱ्यांना भेटण्याकरिता त्यांच्या सोबत दिल्ली येथे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे सहकारी गुरमीतसिंग मंगत (गाजीपुर बॉर्डर),तेजविर सिंह (हरियाणा),अमरदीप सिंग (पंजाब), गुरविंदर सिंग (नागपूर सरपंच सहाब),संदीप दुबे(महाराष्ट्र किसान युनियन),श्रीकांत बिल महाराष्ट्र किसान युनियन), विदर्भ संयोजक श्रीकांत तराळ, सुनील चोखारे आदींसह सर्व प्रतिनिधी यवतमाळ येथे जात असताना महाविकास आघाडीतर्फ बुटीबोरीबस स्टॉप येथे सर्वांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव मुजीबा पठाण, बाबूभाई पठाण,सुधीर देवतळे, राजू गावंडे, यूसूफभाई शेख,आशिष बरधने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीपसिंग चंदेल,दामू गुजर, शिवसेनेचे नगरसेवक सरफराज शेख,मनोज ठोके तुषार डेरकर ,दिलास भोगले,संजय उताने नागेश गि-हे,शकी शेख,सदन राखडे, रजत वरधने, विभोर आंबटकर,तुषार उकाणे,राजू सिंग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

किसान एकता तुटणार नाही मोदी सरकारने किसान आंदोलकाना रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी किसान आदोंलनकामध्ये एकता आहे. वर्धा येथील किसान सभेला संबोधित केल्यानंतर यवतमाळ येथील महामेळाव्याला कोरोनाच्या नावाखाली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आझाद मैदानावर येवुन किसान एकता कधीही तुटणार नाही हे दिसल्याचे गुरूनार यांनी आझाद मैदानावर बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल सिकंदर शहा, श्रींकात तराळ, संदीप गिहे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

संयुक्त किसान किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत आझाद मैदानावर  किसान मेळाव्याला संबोधित करणार होते. मात्र, केंद्र सरकारने टिकैत यांचे हवाई कितीही टिकीट ऐन वेळी रद्द करून आंदोलन किसान फसविण्याचा प्रयत्न केला. यानंतरही दिल्लीतील सीमावर्ती भागात सुरू असलेल्या आंदोलकानी यवतमाळ  येथील आझाद मैदानात मोदी सरकार महामेळाव्याला विरूद्ध घोषणाबाजी करून शेतकऱ्यांचे नावाखाली आंदोलन कोणत्याही राजकीय दडपणाखाली थांबणार नाही असा इशारा दिला. कोराना नियम पाळून महामेळावा घेण्याचे शपथपत्र   दिल्यानंतरही याप्रकारच्या दबावतंत्राने मात्र शेतकऱ्यांमध्ये संताप दिसला.नागपुरवरून निघालेल्या शेतकरी नेते, आंदोलकाना वर्धा येथील शिरपुर रोडवर यवतमाळ पोलीसांनी रोखून धरले. सायंकाळी ५ वाजता आंदोलकानी बैरीकेड तोडून यवतमाळात प्रवेश करू असा नारा दिल्याने अखेर पाचशे पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेला धोका निर्माण होईल यासाठी आंदोलकाची वाहने सोडून दिली 

त्यानंतर आदोलकानी किसान एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादचा नारे देत आझाद मैदानावर प्रवेश केला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांच्यासह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आझाद मैदानावर तैनात पोलीसांनी महामेळाव्याला आलेल्या शेतकऱ्यांना ताब्यात घेत शासकीय वाहनाने पोलिस मुख्यालयी स्थानबद्ध केले व सर्व वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. यावेळी आझाद मैदानाला छावणीचे स्वरूप आले होते. संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिडे पाटील तसेच श्रींकात तराळ यांनी शेतकऱ्यांना आझाद मैदानावर येण्याची हाक दिली होती. या हाकेला ओ देत जिल्ह्यातील अनेक शेतकरी आज आपले काम सोडुन राष्ट्रीय किसान नेते राकेश टिकैत यांच्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले असता जिल्ह्यातील शेतकन्याना पोलिसांनी रस्त्यातच रोखले व परत पाठविले. अनेक ठिकाणी शेतकऱ्याना स्थानबद्ध केले.

Post a Comment

0 Comments