Top Post Ad

सदाशिव टेटविलकर लिखित “गावगाडा प्राचीन ते अर्वाचीन” पुस्तकाचे २१ फेब्रुवारी रोजी प्रकाशन

ठाणे: सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर लिखित गड, किल्ले ,लेणी , मंदिर ,मूर्ती ,वीरगळे अशा नानाविध वाचकप्रिय पुस्तकांनंतर आपली संस्कृती इतिहास आणि काळानुरूप बदलणाऱ्या परंपराचा वेध घेणारे सदाशिव टेटविलकर लिखित गाव गाडा प्राचीन ते अर्वाचीन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि २१ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड ठाणे येथे सायंकाळी ५ते ७ या वेळेत सोशल डिस्टन च्या नियमात संपन्न होत आहे.

पुस्तकाचे प्रकाशन मा नरेश म्हस्के महापौर ठाणे यांच्या शुभहस्ते होणार असून समारंभाचे अध्यक्ष मा डॉ राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी ठाणे व मा डॉ बी. डी. कुलकर्णी उपाध्यक्ष भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे व अधिष्ठाता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोकण इतिहास परिषद, मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आणि श्रीकृपा प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक आहेत या निमित्ताने समस्त ठाणेकर इतिहासप्रेमी वाचक मित्रांना जाहीर निमंत्रण व आवाहन करण्यात येत आहे की पुस्तक प्रकाशनाला आवर्जून उपस्थित राहावे कळावे

संपर्क ९७६९४२८३०६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com