Top Post Ad

शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज व्यापाऱ्यांकडून विकत घेतलेली फिरंगी तलवार


 छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८ प्रमुख तलवारी होत्या, त्यातील सर्वात महत्वाची तलवार फिरंगी तलवार जी सध्या रॉयल ब्रिटीश संग्रहालय इंग्लंडमध्ये आहे. शिवाजी महाराजांनी फिरंगी तलवार Portuguese  व्यापार्यांकडून विकत घेतली होती. शिवाजी महाराजानी शिवरायांनी फिरंगी तलवार मध्ये काही बद्दल देखील केले, ते म्हणजे तलवारीच्या मुठीमध्ये कापसाची गादी भरली जेणेकरून  घाम आल्यावर तलवार हातातून निसटणार नाही.

ज्या प्रकारे राम आणि कृष्ण ह्यांना विष्णूचा अवतार घोषित करून त्यांचा वापर दान आणि दक्षिणा मिळवण्यासाठी भटांनी केला तसाच प्रकारे मराठा साम्राज्याचा बाबतीत भाकड कथा रचणे योग्य का? छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने स्वतः प्रगट होऊन तलवार दिली होती आणि त्याच तलवारीला भवानी तलवार म्हणतात असा अपप्रचार देशभरात करण्यात आलेला आहे. काही इतिहास्कारांनीच असा अपप्रचार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचू नये अशा या अपप्रचाराने कर्तृत्वप्रधान महाराष्ट्रीय समाज दैववादी बनून बसला आणि महाराजांना भवानी मातेचा आशीर्वाद होता म्हणूनच ते इतके पराक्रम करू शकले आणि संकटातून नेहमी वाचत राहिले असाच विचार समाजमनात पेरला गेला. चांगल्या नशिबाशिवाय काहीच करता येत नाही असे लोक समजू लागले. 

या इतिहासकारांनी असा प्रचार का केला हे त्यांनाच माहित. त्यांनी असे चुकून केले असे समजायला आपण काही मूर्ख नाही कारण सावंतवाडी जवळील कुडाळ गावातून एका पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून ३०० होन (१०५० रुपये) रोख देऊन ही तलवार विकत घेतल्याची नोंद महाराजांनी त्यांच्या दफ्तरात करून ठेवलेली आहे. महाराज केलेला प्रत्येक खर्च दफ्तरात लिहित असत कारण हिशोबात पक्के असण्याचा महाराजांचा कटाक्ष होता. ५ मार्च १६५९ ला ही तलवार विकत घेतल्याचे येथे नमूद केले आहे. असे असूनही या इतिहासकारांनी असल्या प्रकारचा अपप्रचार का केला असावा हे समजण्याइतके आपण सर्व सुज्ञ आहात. पुन्हा जर कुणी शिवरायांच्या तलवारीच्या बाबतीत असा अपप्रचार केला तर आपण कुणीही या भूलथापांना बळी पडू नये. 

1) एकूण आठ तलवारी असताना इतर तलवारीना शिवाजी महाराजांनी दैवी नाव भवानी का दिले नाही?
2) एकाही किल्याला शिवाजी महाराजांनी भवानी देवीचे नाव का दिले नाही?
3) देशी तलवारीला नाव न देता विदेशी तलवारीला भवानी तलवार असे नाव का दिले?
4) भवानी देवीने तलवार दिली किंवा तलवारीला भवानी नाव दिले हा काल्पनिक इतिहास पळीपंचपात्रवाल्यांनी तयार केला आहे, हे आपल्या केव्हा लक्षात येईल?
5) काही दैववाद करणाऱ्या इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि शिवरायांना भवानी तलवार स्वयं भवानी मातेने प्रगट होऊन दिले आहे. जर भवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली तर मग त्याच प्रकारची तलवार शाहजहान ह्या मुस्लीम शासकाकडे व बाजीराव पेशव्याकडे कोठून आली, शाहजहान आणि बाजीराव पेशव्याला पण भवानी माता प्रसन्न झाली होती का?
6) सध्या फ्रान्सीस gouitier ह्या फ्रेंचमनने भवानी माता शिवरायांना तलवार देतांनाचा पुतळा बनवला आहे, अश्या स्वरूपाचे पुतळे उभारून आपण जिजामाता व शिवरायांचे कर्तृत्व नाकारत आहोत का? ज्या शिवरायांनी मनगटाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले, त्याला दैव वादाचे रूप देणे योग्य आहे का?
7) शिवरायांना देवी प्रसन्न झाली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असा प्रचार करणे योग्य आहे का?

 (संकलित माहिती)

संदर्भ -
⚫ इतिहास ः सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998, पृ. 132-133.
⚫ "भावनांशी खेळ नको!' (29-11-1980) व "पुन्हा एकदा भवानी' (8-12-1980) हे गोविंदराव तळवलकर यांचे "महाराष्ट्र टाइम्स'मधील अग्रलेख.
⚫ Desperately Seeking ShivajiH$s Sword - Times of India, 2 Jul 2002.

-------------------------------

महाराष्ट्र राज्यात , मु.पो. सांबरी, ता.अलिबाग ,जि.रायगड या ठिकाणी भवानी बाई पाटील व हिराबाई पाटील या दोन जुळ्या बहिनी रहात होत्या. इ.स.१६२५/२७ दरम्यान कार्ला संस्थान येथे पोर्तुगीजांचा व्यापार होता तिथे बायकांची विक्री होत आहे. हे जेव्हा जिजामातांच्या लक्षात आलं तेव्हा त्यानी शहाजी महाराजांना ती बातमी सांगितली. जनावराप्रमाणे बायकांची विक्री होणे त्यांना पटलं नाही हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटलं .तेव्हा तो व्यापार शहाजी महाराजांसमवेत जाऊन त्यांनी बंद पाडला व तेथे विक्रीसाठी असलेल्या भवानीबाई व हिराबाईला त्या सोबत घेउन आल्या. १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शहाजी राजे मोगल सैण्याशी लढाई करत असतांना त्यांना कल्याण पारगण्यात सहा महिने भुमिगत रहाव लागल.( म्हणुनच तो प्रांत शहापुर या नावाने प्रसिद्ध झाला ) शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पाच वर्षे किल्ला लढविल्यावर किल्ल्यावरील रसद संपत आलि.तेव्हा *माँ साहेब जिजाऊनी निर्णय घेतला व हिराबाईला सोबत (विश्वासात घेउन मोगल सेनापतिला चर्चेत गुंतवल आणि भवानीबाई पाटील बाळ शिवरायांना घेउन साबरी गावी निघून गेल्या.भवानीबाईने शिवराय ५ ते १२ वर्षाचे होईपर्यंत त्याच आई प्रमाणे संगोपन केलं.         

इ.स.१६४२ मध्ये तुकाराम महाराज कोकण दौऱ्यावर असतांना त्यांनी जिजाऊ आणि भवानीआईची भेट घडवून आणली.तेव्हा जिजाऊंच्या डोळ्यातुन अश्रु वाहू लागले. आपल्या मुलाचं संगोपन भवानीने उत्तम पध्दतीने केले ते पाहून त्या भावूक झाल्या.आणि भवानीआईला म्हणाल्या "तु माझ्या बाळाला पोटच्या आपत्यांप्रमाणे वाढवलस, मी तुला वचन देते भविष्यात जेव्हा केव्हा माझ्या मुलाचा जयघोष केला जाईल, तेव्हा तेव्हा तुझ्या नावाचा प्रथम उल्लेख केला जाईल". आणि तेव्हा पासुन  जय भवानी ! जय शिवाजी ! हे घोषवाक्य तयार झाले. छत्रपती शिवरायांना कोणत्याही काल्पनिक देविने नव्हे तर आई भवानी पाटीलने व सांबरी गावच्या ग्रामस्थांनी तलवार बाजी व व युद्ध कला शिकवली होती.ब्रिटनची राजधानी लंडनच्या संग्रहालयात जी हिरेजडित मुठ असलेली  भवानी तलवार आहे ती शिवरायांनी इ.स.१६४८ दरम्यान कोकणातील सरदार सावंताच्या शस्त्रास्त्र लिलावात सुमारे ३५० होनला विकत घेतली होती. अशी नोंद राजेंच्या लेखापाल विभागात आहे.

         माधुरी सपकाळे - कल्याण

-------------------------------------------

 एका विशिष्ट धुर्त हेतुने शिवरायांच्या दैदिप्यमान आशा इतिहासाचे विकृतीकरण करणारया मनुवाद्यांनी अगदी जाणीवपूर्वक रेखाटलेल्या  एका कल्पोकल्पित चित्राने बहुजनांच्या अनेक पिढ्यांना मानसिक गुलाम बनविले व ज्या  छत्रपती शिवरायांनी आठरा पगड जातींना व बारा बलुतेदारांना अगदी शिताफीने एकत्रित करून मनगटाच्या व बुद्धी चातुर्याच्या बळावर तसेच वेळोवेळी केलेल्या मुत्सद्दी राजकारणाच्या बळावर अनेक पातशाह्यांना प्रत्यक्ष रणांगणात नामोहरम करत घडविलेल्या प्रचंड प्रेरणादायी व आदर्शवत आशा इतिहासापासून दूर ठेवले. मनुवाद्यांनी रेखाटलेल्या ह्या एका तथाकथित कल्पो कल्पित चित्रामुळे गेल्या 60/70 वर्षात बहुजनांच्या अनेक पिढ्या बौद्धिक दृष्ट्या बधिर झाल्या.

कारण प्रत्यक्ष भवानी माताच शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली होती व भवानी मातेने शिवरायांना तलवार दिली होती म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज इतका पराक्रम गाजवू शकले असा एक प्रचंड मोठ्ठा गोडगैसमज बहुजनांनी करून घेतला नव्हे तर विकृत मानसिकतेच्या मनुवाद्यांच्या पिलावळींनी पिढ्यांन् पिढ्या कुजबूज मोहिमे अंतर्गत हा आशा प्रकारचा गोडगैसमज बहुजन जनमानसात अगदी नियोजनबद्ध पद्धतीने रूजवला.परिणामी अलीकडचा बहुजन प्रबोधनाचा कांही काळ सोडला तर गेल्या अनेक दशकांपासून बहुजन समाज छत्रपती शिवरायांच्या व छत्रपती शंभूराजेंच्या खरया इतिहासापासून कोसो दूर फेकला गेला.आजही मी जनमानसात वावरत असतेवेळी दैववादावर विसंबून असणारया व कर्मकांडाच्या आहारी गेलेल्या अनेक वयस्कर लोकांना ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचारतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो....

त्यावेळी आपलेच असणारे पण दैववादावर विसंबून राहीलेले हे मानसिक गुलाम बहुजन बांधव चर्चेच्या सरतेशेवटी ह्या तथाकथित व कल्पो कल्पित चित्राचा संदर्भ देत शिवरायांना भवानी माता प्रसन्न झाली होती व प्रत्यक्ष भवानी मातेनेच शिवरायांना तलवार दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इतका पराक्रम गाजवू शकले असले भंपक वक्तव्य करून हात झटकून मोकळे होताना मी अनेकवेळा अनुभवले आहे. धर्माआड लपून आपला मनुवादी अजेंडा राबवू इच्छिणारया संघटनांकडून आज पर्यंत बहुजन महापुरषांचे दैवीकरण करण्याचे असंख्य प्रयत्न झाले व आजही होत आहेत. मनुवाद्यांच्या ह्या अजेंड्याला आपण व आपला बहुजन समाज बळी पडत गेला व खरया इतिहासापासून दूर राहिला याच मुख्य कारण म्हणजे

पन्नास-साठ च्या दशकानंतर बहुजन प्रबोधन चळवळीत खंड पडला व नेमक्या ह्याच वेळी तथाकथित संस्कृती रक्षक धार्मिक संघटनांनी खोट्या राष्ट्रवादाच्या नावाखाली डोकं वर काढलं मनुवाद्यांच्या ह्या आशा अतिक्रमणामुळे आज पर्यंत असंख्य बहुजन युवक-युवती फुले,शाहू,आंबेडकर व इतर बहुजन महापुरषांच्या विचारांपासून दूर होत गेले. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा इतर बहुजन महापुरष ह्या बहुजन महापुरषांच्या आड लपून धर्म व संस्कृतीच्या नावाखाली आपले धुर्त मनुवादी हेतू साध्य करण्यासाठी टपून बसलेल्या संघटनांचे मनसुबे आगामी काळात साध्य होऊ द्यायचे नसतील व वाढत चाललेला धार्मिक उन्माद थोपवायचा असेल तर आपल्या बहुजन महापुरषांच्या विचारांचा व त्यांच्या कृतीचा जयजयकार फक्त त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी न करता सतत व निरंतर होत राहिला पाहिजे.

जय जिजाऊ! जय शिवराय!

 - अमर रामचंद्र गोडसेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com