जिलानी इमारत दुर्घटना: विकासकासह भिवंडी महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक

 

भिवंडी
 ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल नगर येथे धोकादायक असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 38 रहिवाशांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी शासन आदेश वरून येथील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या विशेष पथकाने या प्रकरणी सखोल तपास करून पोलिसांनी तब्बल 7 महिन्यांनी महानगर पालिकेच्या ततकालीन प्रभाग अधिकाऱ्यांसह तिघांना व विकासक अशा चौघांना पोलिसांनी आज सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली आहे.

  तत्कालीन प्रभाग अधिकारी सुदाम जाधव,बिट निरीक्षक सुनील वगळ व प्रकाश तांबे आणि विकासक फंडोले अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. शहरातील धामणकर नाका पटेल नगर भागातील परिसरात असलेली जीलानी इमारत 21 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोसळली होती या दुर्घटनेत 38 रहिवाशांचा मृत्यू झाला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती.सदर इमारत ही अतिधोकादायक असल्याने महापालिका  अधिकाऱ्यांनी सदर इमारतीस दोन वेळा नोटीस बजावली होती.इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवासी याना घरातून बाहेर काढुन इमारत पाडणे  गरजेचे होते असे असताना त्यांनी आपल्या कामात कसूर केल्याने सदर इमारत दुर्दैवाने कोसळली या दुर्घटनेत 38 रहिवाशांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस व महापालिकाआयुक्त  प्रशासनाला दिले होते त्यामुळे पोलिसांनी नारपोली पोलीस ठाण्यात या इमारत दुर्घटना संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. त्या नुसार पोलिसांनी चौकशी अंती या गुन्ह्यातील चौघांना आज अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या