लॉकडाऊनमुळे बेहाल झालेल्या कष्टकरी मजूर जनतेसाठी धावणारा - कोरोना योद्धा

 दिनांक 14 एप्रिल 2020... बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती... मात्र देशासह संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने सर्वच जीवन ठप्प करून सोडलं. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच देश लॉकडाऊन झाला. अचानक झालेल्या या  भयावह परिस्थितीमुळे प्रत्येक नागरिक भयभीत झाला होता. " आली रे आली जयंती आली " च्या व्हॉट्अप कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. घरातून बाबासाहेबांना वंदन करण्याचे शासकीय आदेश आले.  वर्गणीच्या माध्यमातून डीजे लावून " जयभीम के नाम पे " म्हणण्रायांना घरात बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही.  मात्र समाजसेवेचा ध्यास घेतलेल्यांना घरात कसे बसावेसे वाटेल. लॉकडाऊनमुळे मध्यमवर्गीय आणि त्यातही मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारे मजूर भूकेने बेहाल झाले. अशा स्थितीत बाबासाहेबांच्या जयंतीला एक वेगळा संकल्प करून बहुजन संग्रामच्या माध्यमातून भीमराव चिलगावकर यांनी आपल्या मदतकार्याला सुरुवात केली.  

 संस्था, संघटना ही व्यक्तींनी बनलेली असते. त्या व्यक्ती काम करतात तेव्हा संघटनेचे नाव होते. जयंतीच्या निमित्ताने अनेक संस्था, मंडळं उदयास येतात आणि जयंती झाली की त्याचे कार्यकर्ते कुठे असतात ते काही समजत नाही. ते थेट दुस्रया जयंतीलाच दिसतात. अशा अनेक संस्था गल्लोगल्ली दिसतात. मात्र बहुजन संग्राम या संस्थेने हा कित्ता पुसून काढत या कोरोना काळात आपली वेगळी ओळख निर्माण केली ती केवळ त्याला लाभलेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्यामुळेच... लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने  कोरोनाच्या या जागतीक महामारीपेक्षा उपासमारीने हातावर पोट असलेली गोरगरीब लाखो जनता मरणासन्न अवस्थेत जगत होती. म्हणून कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पत्करून जीवाची पर्वा  न करता ते संपूर्ण राज्यभर वणवण भटकंती करत एका हाताने घेऊन दुस्रया हाताने वाटप करीत होते.   मुंबई आणि ठाणे जिह्यातील महापालिका, महसुल, जल सिंचन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आदी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी या मानवतावादी कार्यासाठी दिलेली मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य चिलगावकर यांनी कोणताही मुलहिजा न ठेवता केले.   

कोरोना महामारीच्या काळात रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार आणि आदिवासी बांधवांचे जगणे असह्य झाले होते. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. घरात काही नाही, पण घराबाहेर पडू शकत नाही अशा अवस्थेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. अशा विवंचनेत, कंत्राटी कामगार, मजूर, आणि खेड्यापाड्यात असलेला आदिवासी सापडला. इतकेच नव्हे तर नाका कामगार, बांधकाम मजूर, मोलकरणी, निराधार महिला, परीत्यक्ता या घटकांचे देखील या महामारीने जिवन नकोसे केले होते. या सर्वांना बहुजन संग्रामच्या माध्यमातून भीमराव चिलगावकर यांनी कोरोना काळात मदतीचा हात दिल्याने हजारो कुटुंबाच्या चेहऱयावर हास्य फुलले.  प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो गोडेतेल, 1 किलो साखर असे 12 किलो जीवनावश्यक वस्तू वाटप केले.  14 एप्रिल पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे  एकूण 12 हून अधिक टप्पे पार पडले. मुंबईतील पहिल्या टप्प्यात 1600, दुस्रया टप्प्यात 700, तिस्रया टप्प्यात 900, चौथ्या टप्प्यात पालघर जिह्यातच 600 आदिवासी कुटुंबाना पालघर जिह्याच्या वाडा तालुक्यातील घोडमाळ या गावामधील आदिवासी पाड्यांतील 1200 कुटुंबाना मदतीचे वाटप करण्यात आले. मिशन बिगीन अगेन अंतर्गत (अनलॉक-2) च्या काळात 26 जुलैला ठाणे जिह्यात 1200 /(बाराशे) 31 जुलै उत्तर महाराष्ट्र 1300 (तेराशे) 9 ऑगस्ट मराठवाडा 1000 ( एक हजार) व 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या मूहूर्तावर 1500( पंधराशे) मुंबई शहर व उपनगरांतील असे सुमारे  5 हजार गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचे उद्दिष्ट  पुर्ण करण्यात आले.   तर मुरबाड तालुक्यातील पोटगाव या दुर्गम गावांतील आणि  लगतच्या पाड्यांतील शेकडो आदिवासी कुटुंबांना पोतडीभर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. जनसेवा-जनाधार सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा शुभोत्तमा निर्भवणे यांच्या विशेष योगदानामुळे आदिवासींना यावेळी शिधा- किरणासोबतच साडी- चोळीचेही वाटप करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात विजया दशमीला  भांडुप ( पश्चिम) येथील गरजू कुटुंबांना धान्य आणि किराणाचे वाटप करण्यात आले.  दिवाळीच्या पुर्वसंध्येला पुण्यात 12 नोव्हेंबर रोजी सारनाथ बुद्ध विहार,खराडी गावठाण व सातव वस्तीमध्ये शेकडो कुटुंबांना सुमारे एक हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 30 नोव्हेंबरला 10 वा टप्प्यात पुण्यातील अण्णाभाऊ साठे हॉल येथे शेकडो विधवा, परित्यक्ता, निराधार गरजू महिलांना प्रत्येकी सुमारे एक हजार रुपयांचा किराणाच्या रुपाने मदत करण्यात आली.  

 केवळ मुंबई, ठाणेच नव्हे तर अगदी पुणे नाशिक औरंगाबाद पर्यंत चिलगावकरांनी हे मदतीचे कार्य केले.  महानगरातील आणि उपनगरांच्या झोपडपट्यांच्या वसाहतीमधूनच नव्हे तर पालघर, ठाण्यातील आदिवासी बहूल जिह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या अति दुर्गम भागातही  चिलगावकरांनी मदत कार्य केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे खऱया अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन म्हणावे लागेल. यापेक्षा जंयती कोणत्या पद्धतीने साजरी करता येणे नाही. आजही अनेक विचारवंत नेहमीच आपल्या लेखणीतून सांगत असतात. बाबासाहेबांच्या जयंतीवर होणारा प्रचंड खर्च हा सामाजिक कार्याकरिता खर्च करा. मात्र हिन्दुत्वाच्या सण उत्सवांचे अनुकरण करण्यापलिकडे आपण जयंती साजरी करतच नाही. कोरोना काळात याची जाणीव कदाचित सर्वांनी झाली असावी. आज भीमराव चिलगावकर यांनी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. कदाचित अनेकांनी हे कार्य केले असेल जे आपणापर्यंत पोहोचले नसेल. त्या सर्वच ज्ञात-अज्ञात कोरोना योद्ध्यांना मानाचा जयभीम...  

-- सुबोध शाक्यरत्न 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1