रस्तारुंदीकरण आणि अन्य प्रकल्पांमध्ये विस्थापित झालेल्यांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप


 ठाणे महापालिकेने राबविलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेमध्ये आणि अन्य प्रकल्प कामांमध्ये विस्थापित झालेल्यांना  घरांचे वाटप करण्यात आले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ६०६ सदनिका धारकांना लाँटरी पध्दतीने घरांचे वाटप  करण्यात आले.  महापौरांच्या हस्ते विस्थापित झालेल्या नागरिकांना कायमस्वरूपी सदनिकांचे वाटप करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापौर नरेश म्हस्के म्हणाले,   नागरिकांची निवासी घरे तसेच व्यावसायिक गाळे बाधित झाले. या विस्थापितांना घरे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून कायमस्वरूपी घरे देणारी एकमेव महापालिका आहे. 

कोविडच्या थैमानामुळे या प्रक्रियेला उशीर झाला. या ठिकाणी रूग्णांना क्वारंटाईन करण्यात आले होते, परंतु नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर या घरांची साफसफाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि आज ख-या अर्थाने आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असून याचा मनस्वी आनंद सर्वांनाच होत असल्याचे महापौरांनी नमूद केले.  हे घर तुमच्या नावावर होण्यासाठी घरांचे रजिस्ट्रेशन सरकारी दरानुसार आपल्याला करावयाचे असून यासाठी दलालांच्या अफवांवर बळी पडू नका असे आवाहनही म्हस्के यांनी यावेळी केले. 

घोडबंदर रोड, आनंदनगर नाका ते ग्रॅण्‌ड स्केवर कॉम्प्लेक्स, बुधाजीनगर येथील 18.00 मी. रुंद रस्त्यापैकी तुर्त 12.00 मी रुंद रस्त्यामध्ये बाधित, शास्त्रीनगर ते हत्तीपूल वाणिज्य बांधकामधारक –डावी बाजू, कावेसर येथील आनंदनगर नाका ते वाघबीळ रस्तारुंदीकरण, कावेसर नाका ते विजय ॲनेक्स गृहसंकुल रस्तारुंदीकरण, जोगिला तलाव पुनर्वसन ब्रह्मांड, गावदेवी सफाई कामगार, कोलशेत, डोंगरीपाडा, जोगिला तलाव पुनर्वसन ब्रह्मांड, पोखरण नं. 1 रस्तारुंदीकरण, पारसिक रेल्वे बोगद्याच्यावर वास्तव्य करीत असलेले रहिवासी, शास्त्रीनगर कळवा येथील नवीन पुल बांधकाम, मौजे कळवा शास्त्रीनगर येथील मंजुर विकास आराखड्यानुसार नियोजित 30.00 मी रुंद रस्तारुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना कायमस्वरुपी घरांचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आज एकूण 606 बाधितांना घरांचे वाटप करण्यात आले असून जसजशी घरे उपलब्ध होतील तसे लवकरच दुसऱ्या टप्प्यात देखील घरांचे वाटप केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या